चिंचवड, पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी अजितदादांनी मोठे प्रयत्न केले होते, असं बोललं जात आहे. चिंचवड पोटनिवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गड आला पण सिंह गेला. साहेब गेले, पण त्यांचा गड राखायचा होता. सर्वांनी हा गड राखला आहे. हा विजय साहेबांना, लक्ष्मण जगताप आणि सर्वसामान्य नागरिकांना समर्पित करते, असं अश्विनी जगताप म्हणाल्या.

लक्ष्मण जगताप यांना जिथे अग्नी दिला होता, त्याठीकणी जाऊन चिंचवड मतदारसंघाच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय समर्पित केला. त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झाली होती. यावेळी अश्विनी जगताप या भावुक झाल्या होत्या.

चिंचवड मतदारसंघाच्या मतमोजणीत ३७व्या फेरीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ४३४ मते, नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते, तर राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत अश्विनी जगताप या ३६ हजार ७७० मतांनी विजयी झाल्या आहेत. अश्विनी जगताप या चिंचवडमधून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या पहिल्या महिला आमदार आहेत.
कसब्यात जिंकले रवींद्र धंगेकर, चर्चा मात्र अभिजीत बिचुकले, आनंद दवेंना मिळालेल्या मतांची
विजयानंतर अश्विनी जगताप यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती. गड आला पण सिंह गेला. साहेब गेले, पण त्यांचा हा गड राखायचा होता. हा गड राखण्यात यश आलं आहे. हा विजय लक्ष्मण जगताप आणि सर्वसामान्य मतदारांचा आहे. हा विजय मी त्यांना समर्पित करते, असं अश्विनी जगताप म्हणाल्या. सर्वसामान्यांचा आमदार म्हणून मी काम करेल. जसं साहेबांचं काम होतं, त्याच पद्धतीने मी काम करणार आहे, असं त्या म्हणाल्या. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पयी अधिवेशनाला आपण जाणार आहोत. पक्षाच्या वरिष्ठांनी बोलावल्यानंतर मी जाईल. राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे निवडणुकीत नक्कीच फायदा झाला आहे, असं अश्विनी जगताप यांनी विजयानंतर स्पष्ट केलं.

धंगेकरांचा विजय हा दडपशाहीचा विरोध, सुप्रिया सुळेंकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांचं कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here