यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार टीका केली असून शिवसेना खोक्याने विकत घेता येत नाही हे आज पुण्यात दिसून आलं, असं म्हटलं. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणत ही पेठ आमची ती पेठ आमची असे भाजपचे नेते म्हणत होते. मात्र, आज सर्व पेठा कोसळल्या. इतके दिवस भाजपासोबत शिवसेना होती म्हणून तुम्ही जिंकत होता. मात्र, आज कसब्यात टरबूज फुटला म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्ध्वस्त करु
तसेच, कोणता मिंदे आणि डुप्लिकेट शिवसेना येणार नाही. इतके दिवस आमच्या खांद्यावर बसून तुम्ही आला. मात्र, आता याच खांद्यावर तुमची तिरडी काढणार. तुम्हाला आम्हाला संपवता येणार नाही. आजचा हा निकाल तुमच्या छाताड्यावरचं पहिलं पाऊल आहे, असं म्हणत यापुढे भाजपचे प्रत्येक बालेकिल्ले उध्वस्त करू, असा इशाराच त्यांनी. एकनाथ शिंदे सुद्धा हरणार, कारण ठाणे ही पहिल्यापासून शिवसेनेची आहे आणि येथील महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
नारायण राणे यांचं टिल्लू पोरगं मला धमकी देतंय
दरम्यान, इचलकरंजीमध्ये झालेल्या शिवगर्जना यात्रेच्या सभेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आले होते. संपूर्ण सभागृह हाउसफुल्ल झाले होते आणि ५० खोके एकदम ओके यासह जोरदार घोषणाबाजी सुरू होती. तर, मग संजय राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना २०२४ मध्ये राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार हे पहाच मग बघू कोण ईडी आणि कोण सीबीआय मला देखील अटक केली. पण, येताना मी ईडी ला २०२४ ला भेटू असे म्हणून आलो आहे, असं राऊतांनी सांगितलं.
नितेश राणे यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यावरून देखील त्यांनी जोरदार खिल्ली उडवली. नारायण राणे यांचं टिल्लू पोरगं मला धमकी देतंय याची सिक्युरिटी काढा म्हणून पण तुझं सरकार आहे, काढून दाखव. कोकणात शिवसैनिक आले म्हणून तू लपून बसणारा, तर तिकडे शिंदे गटात गेलेले प्रताप सरनाईक, प्रियंका चतुर्वेदी यांना ईडीची आणि सीबीआयची नोटीस येताच ते खोके घेऊन मिंदे गटात पळून गेले. काल मी ४० जणांना चोर म्हणालो म्हणून अनेक लोकांनी तुम्ही चोरांचा अपमान केला असे मला म्हणाले. ते चोर नसून दरोडेखोर आहेत. चोर देखील प्रामाणिक असतात त्यांची देखील काहीतरी तत्त्वे असतात. तुम्ही चोरांचा अपमान केला म्हणून त्यांची माफी मागा असे अनेक जणांनी म्हटले, म्हणून मी चोरांची माफी मागतो, असे म्हणत राऊतांनी शिंदे गटातील ४० आमदारांची खिल्ली उडवली.
पुढील काळात भाजप देखील यांना तिकीट देणार नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनाजी पंत म्हणत जे नेहमी सर्वांना ज्ञान देत असतात ते २०१९ मध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान एक एग्रीमेंट झाला होता. ज्यामध्ये काय झालं हे सांगितलं. मुख्यमंत्री पदासह सत्तेतील पदांचा समसमान वाटप होईल म्हणाले आणि नंतर पलटी मारली आणि आता मात्र स्वत: उपमुख्यमंत्री झाले.
तुमच्या खात्यातील पैसे काढून मिंधे गटातील लोकांना ५० खोके दिले, असे असले तरी दिवार सिनेमाप्रमाणे या गद्दाराच्या घरच्यांनाही कपाळावर मेरा बाप, पती, भाई गद्दार म्हणून घेऊन फिरावे लागेल. पुढील काळात भाजप देखील यांना तिकीट देणार नाही, अशी जहरी टीका शिंदे गटातील नेत्यांवर संजय राऊत यांनी केली आहे.