इंदूर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया समोर दुसऱ्या डावात विजयासाठी फक्त ७६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला चेतेश्वर पुजारा नांगर टाकून उभा होता. जर पुजाराने १४२ चेंडूत ५९ धावा केल्या नसत्या तर भारत १६३ धावांपर्यंत पोहोचला नसता.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. भारताच्या दुसऱ्या डावातील ५२व्या षटकात रोहित शर्मा मैदानावर खेळत असलेल्या पुजारा आणि अक्षर पटेल यांच्यावर भडकल्याचे दिसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या रोहितने इशारा करून ईशान किशनला जवळ बोलवले आणि पुजारा-पटेल यांना कमकूवत चेंडूवर मोठे शॉट का खेळत नाही असे विचारण्यास सांगितले. एका बाजूला हे दोन्ही फलंदाज विकेट टीकवण्यासाठी खेळत असताना दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा धावांचा वेग वाढवण्यास सांगत होता.

इंदूर कसोटीत भारताचा पराभव निश्चित; कशी पोहोचेल टीम इंडिया WTCच्या फायनलमध्ये, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

Video: चेंडूचा वेग इतका होता की, फलंदाजांच्या डोळ्यासमोर अंधारी आली; स्टंप हवेत उडाल्या…
कर्णधार रोहितचा मेसेज घेऊन ईशान किशन मैदानावर आला आणि दोघांना मोठे शॉट खेळण्यास सांगितल्याचा निरोप दिला. आता कर्णधाराचा निरोप आला म्हटल्यावर संयमी फलंदाजी करणाऱ्या पुजाराने काही षटकातच नाथन लियोनला षटकार मारला. पुजाराने मारलेला हा चेंडू थेट स्टेडियममधील दुसऱ्या मजल्यावर गेला. पुजाराचा हा शॉट पाहून कर्णधार रोहित शर्मा देखील खुश झाला. अर्थात त्यानंतर काही ओव्हरमध्ये लियोनने त्याला बाद केले.

एकट्याने घेतल्या इतक्या विकेट; भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कोणाला जमलं नाही

पहिल्या डावात भारताने फक्त १०९ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने १९७ धावा करून ८८ धावांची आघाडी घेतली. आता दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त ७६ धावांची गरज आहे. भारताने जर १५० धावांचे टार्गेट ठेवले असते तर संघाला विजयाची संधी होती. आता एखादा चमत्काराच या सामन्यात भारताला विजय मिळून देऊ शकतो. WTCच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला आता इंदूर येथे सुरू असलेली किंवा अहमदाबाद येथे होणारी चौथ्या कसोटीत विजय मिळवणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here