मुंबई: ‘कार आणि सरकार दोन्ही चांगल्याप्रकारे सुरू आहेत. मी कारही चालवतोय आणि सरकारही चालवतो आहे’, असे नेमके विधान करत मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांनी तीन पक्षांच्या सरकारचं स्टेअरिंग कुणाकडे, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ( CM On Government )

महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग नेमकं कुणाच्या हाती आहे?, ड्रायव्हर सीटवर कोण बसलं आहे? सरकारला दिशा कोण दाखवतो आहे, असे अनेक प्रश्न गेले काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. त्यात विरोधी पक्षनेते यांनी आजच या सरकारला ‘लीव्ह इन रिलेशनशीप’चंही लेबल लावलं. हे सरकार चालतच नाहीय. हे सरकार अंतर्विरोधातूनच कोसळेल आणि त्यानंतर आम्ही सक्षम पर्याय देऊ, असेही फडणवीस म्हणाले. या अनुशंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारले असता त्यांनी विरोधकांच्या दाव्यांची खिल्ली उडवली.

वाचा:

‘ठाकरे-पवार पॅटर्न तर राज्यात तुम्ही पाहतच आहात. तो अस्तित्वात आलाच आहे. महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आहे व समान किमान कार्यक्रमावर हे सरकार चाललं आहे. आम्ही तिन्ही पक्ष भीन्न विचारांचे आहोत, याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्याबाबत गोंधळ असण्याचं कारणच नाही. त्या सगळ्याचा विचार करूनच आम्ही एकत्र आलो आहोत आणि राज्याच्या हितासाठी यापुढेही एकत्र राहणार आहोत’, असे मुख्यमंत्री म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढणार का, याचा विचार आता करण्याची गरज नाही. राज्यात निवडणुकीला अजून खूप वेळ आहे. कुणी काहीही म्हटलं तरी इतक्यात निवडणुका होणार नाहीत, असं सांगत सरकारला कोणताही धोका नसल्याचेच उद्धव यांनी स्पष्ट केले.

वाचा:

केवळ जनतेच्या काळजीपोटी लॉकडाऊन

करोनाचा प्रादुर्भाव किती आहे, त्यावर लॉकडाऊनचा निर्णय अवलंबून आहे. या टप्प्यात आपण खेळ ओपन केले आहेत. सगळं काही लवकरच सर्व पूर्ववत व्हावं, असं आम्हालाही वाटतं मात्र, येथे फक्त लॉकडाऊनचा नाही तर आयुष्याचा प्रश्न आहे. अर्ध वर्ष असंच निघून गेलं आहे. एकप्रकारे २०२० हे वर्ष डीलिट झाल्यासारखीच स्थिती आहे. तूर्त तरी या साथीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. गाफिलपणा, बेपर्वाई दाखवली तर हा विषाणू घात करेल. या साथीवर आजतरी कुणाकडेही उत्तर नाही. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. लॉकाडाऊन वाढवायला, तुम्हाला डांबून ठेवायला मला अजिबात आनंद होत नाही. केवळ तुमच्या काळजीपोटी मनाविरुद्ध जाऊन मला या गोष्टी कराव्या लागत आहेत. तेव्हा कृपा करा आणि सहकार्य करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here