नवी मुंबईः राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली तरी अजूनही करोनाचा प्रसार थांबलेला नाहीये. मुंबईतील करोना रुग्णसंख्या अटोक्यात आली असली तरी मुंबईलगतच्या क्षेत्रात रुग्णवाढ कायम आहे. ठाणे महापालिकेनं लॉकडाऊन वाढवल्यानंतर आता नवी मुंबई महापालिका प्रशासनानं लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या ४४ हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रांत लॉकडाउन कायम राहणार आहे.

कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी नियमित व्यवहार सुरु राहणार आहेत. असा आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जारी केला आहे. राज्य शासनाने जाहीर करण्यात आल्याप्रमाणे मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्समधील दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळीपर्यंत समविषम पद्धतीनं दुकानं सुरू राहणार आहेत. मात्र, मॉलमधील उपहारगृह व चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत ३९८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५,३८५ इतकी झाली आहे. तर त्याचबरोबर शहरात एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत शहरात एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ४१८ इतकी झाली आहे. तर २४९ रुग्णांनी करोनावर मात केली असून एकूण बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या १०,३६५ इतकी झाली आहे. अजून २८२ व्यक्तींचा करोना अहवाल येणे प्रलंबित आहे. आज एकूण २३४७ इतक्या अँटीजेन चाचणी करण्यात आल्या असून आत्तापर्यंत एकूण १६,३२० इतक्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर वाशी येथील प्रदर्शन केंद्रातील करोना केंद्रात ६८५ रुग्ण उपचार घेत असून पालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १२४ इतकी आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here