रस्त्याच्या कडेला थांबणे वृद्ध शेतकऱ्याच्या जीवावर बेतले
शुभम दयानंद गरड (वय २८ वर्ष) याने दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश अर्जुन सेनमारे (वय ३४ वर्ष, रा. नरखेड, ता. मोहोळ) या टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोकरे हे करीत आहेत.
आनंदा विश्वनाथ गरड (वय ६७, रा. रानमसले, ता. उ. सोलापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मयत आनंदा गरड हे रानमसले-बीबीदारफळ रोडवर रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी टँकर चालकाने आनंदा गरड यांना धडक दिली.
उपचारासाठी नेईपर्यंत उशीर झाला
टँकरच्या धडकेत वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाले होते. ग्रामस्थांनी वृद्ध शेतकऱ्यास जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास ग्रामीण पोलीस दलातील सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. मयत आनंदा गरड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.
कोबीला मिळतोय फक्त 2 रुपये कवडीमोल भाव; शेतकऱ्याचा संताप, थेट एक एकर पिकावर रोटर फिरवला