sandeep deshpande attack, Sandeep Deshpande: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर टोळक्याचा स्टम्प आणि रॉडने हल्ला – mns leader sandeep deshpande attack in shivaji park near raj thackeray residence
Sandeep Deshpande attack | संदीप देशपांडे हे राज ठाकरेंच्या मर्जीतील नेत्यांपैकी म्हणून ओळखले जातात. दादर परिसरात त्यांना मानणारा बऱ्यापैकी वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ल्यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला
हायलाइट्स:
राज ठाकरेंच्या घरापासून हाकेच्या अंतरावर घडली घटना
संदीप देशपांडे हल्ल्यात जखमी
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. संदीप देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला आणि पायावर स्टम्पचा फटका बसल्याने दुखापत झाली आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.