वाचा:
सुशांतसिंह प्रकरणी होत असलेल्या आरोपांकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खरमरीत शब्दांत खडेबोल सुनावले. मुख्यमंत्र्यांचा रोख भाजप आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडे होता. विरोधी पक्षाबद्दल काय बोलावं, ते या प्रकरणाचा तपास करण्यासाठी इंटरपोल किंवा नमस्ते ट्रम्पच्या पुरस्कर्त्यांनाही पाचारण करू शकतात, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.
वाचा:
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. ते ज्या पोलिसांच्या क्षमतेवर शंका घेत आहेत, त्याच पोलिसांसोबत त्यांनी गेली पाच वर्षे काम केले आहे. पोलीस आज कोणत्या अवस्थेतून जात आहेत, याचे जरा तरी भान बाळगा. पोलीस करोनाला बळी पडत आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी ते स्वत:चे आरोग्य धोक्यात घालत आहेत. त्यामुळे उगाच नकोत्या कंड्या पिकवू नका. पोलिसांवर शंका घेणं हा त्यांचा अपमान आहे, असा तीव्र संताप मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सुशांतसिंह प्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. याबाबत कुणाकडे काही ठोस पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्यावेत. त्यात तथ्य आढळल्यास जो कुणी दोषी असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. सुशांतच्या चाहत्यांनी महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवावा. महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांत वाद लावण्यासाठी जे कुणी राजकारण करत आहेत, त्यात फरफटत जाऊ नये. पुरावे दिल्यानंतर सरकारने कारवाई केली नाही तर नक्कीच तुम्ही आम्हाला जाब विचारा, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.
वाचा:
हे आहे पोटदुखीचे कारण…
मी स्वार्थासाठी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसलेलो नाही तर जनतेची काळजी घेण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या सरकारने नुसतं बोलून नाही तर करून दाखवलं आहे. सगळं काही व्यवस्थित चाललं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझा चांगला समन्वय आहे. करोना संकटाच्या काळात केलेली प्रत्येक विनंती त्यांनी मान्य केली आहे व केंद्राकडून मदतीचा हात दिला आहे. कदाचित याचीच पोटदुखी राज्यातल्या त्यांच्या नेत्यांना झाली असेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात लगावला. मुख्यमंत्री एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I really like and appreciate your blog post.
I really like and appreciate your blog post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.