काय झालं नेमकं?
दीपाली सय्यद : मेथीत मेथी भाजीची (स्वतःलाच टाळी दिली)
सूत्रसंचालक : भाजीत भाजी मेथीची भाजी… असं आहे आमच्याकडे
दीपाली सय्यद : नाही-नाही..
सूत्रसंचालक : बरं-बरं ओके.. कॅन्सल आहे माझं, त्यांचंच बरोबर
दीपाली सय्यद : माझंच बरोबर… मेथीत मेथी भाजीची, कारण ती मला आवडते, म्हणून मेथीत मेथी भाजीची, भाजीत भाजी मेथीची, पण ठीक आहे, हा ऱ्हाईम बरोबर आहे, मेथीत मेथी भाजीची… आणि बॉबीराव माझ्या प्रीतीचे
सूत्रसंचालक : नाही जुळलं नाही
कोण आहेत दीपाली सय्यद?
दीपाली सय्यद यांनी २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर दीपाली सय्यद यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला होता. पुढे २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कळवा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. मात्र राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.
शिवसेनेतील फुटीनंतर दीपाली सय्यद यांनी समेट घडवण्याची भाषा केली होती. मात्र ठाकरे गटाकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. नोव्हेंबर महिन्यापर्यंत बांधावर राहिलेल्या सय्यद यांनी अखेर ठाकरेंना रामराम केला. मात्र त्यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.