सीएसएमटी स्थानकात महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव जसपाल सिंह असं आहे. तो गेले काही दिवस महिलेवर नजर ठेवून होता. तिच्या येण्या-जाण्याच्या वेळाही त्याने माहिती करुन घेतला होता. महिला बसमधून उतरल्यानंतर लोकल पडकण्यासाठी सीएसएमटी स्थानकाजवळ यायची. त्याचवेळी तिने सिंग याला सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरील बसस्टॉपजवळ पाहिले. त्यानंतर तिचा पाठलाग करत तो स्थानकातदेखील यायचा. याविषयी घाबरलेल्या महिलेने तिच्या मित्रांना याविषयी माहिती दिली होती.
बुधवारी, सिंग महिलेचा पाठलाग करत असताना तिच्या मित्रांनी पाहिलं. त्यानंतर अचानक त्याने तिला स्पर्श करत विनयभंगाचा प्रयत्न केला. महिलेना प्रसंगावधान राखत आरडा-ओरडा केला. तेव्हा तिथे जवळपास असलेल्या तिच्या मित्रांनी सिंगला पडकले आणि त्याला सीएसएमटी जीआरपी पोस्टवर नेण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तर नालासोपाऱ्याच्या घटनेत, २९ वर्षीय महिला मालडब्ब्यात चढत असताना एका व्यक्तीने तिची छेड काढली तसंच तिला स्पर्श केला. तिने यासंबंधी जाब विचारल्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. मात्र, डब्ब्यात गर्दी असल्याने तो निसटला. या घटनेनंतर महिलेने वसई जीआरपी चौकी गाठली.