गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ३ वर्षीय मुलगी रात्री साडेतीन पासून बेपत्ता असल्याची माहिती तिच्या पालकांनी रेल्वे पोलिसांना दिली. लहान मुलगी गायब झाल्याचे गांभीर्य ओळखत तत्काळ मुलीची शोधाशोध सुरु करण्यात आली. सदर मुलगी बेशुद्ध अवस्थेत १ क्रमांकाच्या फलाटावर एका बाजूला आढळून आली. तिला तत्काळ पनवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची अवस्था पाहता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, सीसीटीव्ही व तांत्रिक तपासही वेगाने सुरु करण्यात आला होता. या वेगवान तपासणे जुईनगर रेल्वे स्टेशनवर संशयित आढळून येताच त्याला ताब्यात घेत पोलिसानी चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यात आरोपीला अटक करण्यात आले असून मुकेशकुमार बाबू खा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार सदर मुलगी लघुशंकेसाठी उठली होती. त्याच वेळेस तिला गोड बोलून जवळ बोलावले होते. आरोपी हा रेल्वे स्थानक परिसरातच भंगार वस्तू बाटल्या आदी गोळा करून ते विकून उदरनिर्वाह करतो. पोलिसांनी तात्काळ केलेल्या हालचाली मुळे गुन्हा दाखल झाल्यावर केवळ पाच तासात आरोपी गजाआड झाला. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी दिली आहे.
रेल्वे स्थानकांमध्ये घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावरील, स्थानकांमध्ये राहणाऱ्या झोपणाऱ्या स्रिया लहान मुलींच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानक रस्त्यावर राहणाऱ्या मुली आणि स्त्रीयांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण कधी होणार ? किंवा यांच्या सुरक्षेचे काय? असा गंभीर प्रश्न उपस्थित राहत आहे.