पोलिस दलासह नोएडाचे पोलिस उपायुक्त आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ४ दबलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सेक्टर-११च्या एफ ब्लॉकमध्ये घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या घटनेवर स्वत: लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त आलोक सिंह यांनी दिली. मृतांमध्ये कंत्राटदार जैनेंद्र आणि मजूर गोपी यांचा समावेश आहे. दोघेही कानपूर ग्रामीणचे रहिवासी असल्याचे कळते. जखमींमध्ये लोनीचा रहिवासी सागर आणि बागपतचा छपरौलीचा राहणारा राहुल यांचा समावेश आहे.
ही बातमी वाचा:
घटना घडली तेव्हा इमारतीत होते एकूण ५ लोक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या मागील भागात सोलर पॅनल बनवणारा कारखाना सुरू आहे. आणि इमारतीचे बांधकाम पुढील भागात सुरू होते. तोच भाग कोसळला. मात्र इमारत कोसळली तेव्हा या इमारतीत फक्त ५ लोक होते. यामुळे सुदैवाने मोठी मनुष्यहानी झाली नाही. या इमारतीत इमारतीच्या मालकाची पत्नी आणि काही मजूर होते. इमारतीच्या मालकाची पत्नी इमारतीच्या मागील बाजूस होती मात्र ती इमारतीत अडकली. मात्र, या महिलेला बचावकार्यादरम्यान सुरक्षित बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक रजनीश वर्मा यांनी दिली.
वाचा:
दोघे जखमी असलेल्यांपैकी एकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुसऱ्याला दिल्लीतील रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही दुर्घटना प्लंबिगचे काम सुरू असताना घडल्याचे इमारतीच्या मालकाचे म्हणणे आहे, मात्र या प्रकरणाचा तपास केला जाईल, असे अपर पोलिस आयुक्त श्रीपर्णा गांगुली यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times