fifth wife killed her husband, चार पत्नींनी घर सोडलं, पाचवीने नवऱ्याला जन्माची अद्दल घडवली; पतीसोबत केला अमानुष प्रकार – fifth wife killed her husband cut his private part in madhya pradesh
मध्य प्रदेशः सिंगरौली जिल्ह्यात हत्येची थरारक घटना घडली आहे. महिलेने तिच्याच पतीची निघृण हत्या केली आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बीरेंद्र गुर्जर असं मृत व्यक्तीचं नाव असून २१ फेब्रुवारी रोजी त्याची हत्या करण्यात आली होती. बीरेंद्रच्या गळ्यावर व गुप्तांगावर जखमांचे व्रण पोलिसांना सापडले आहेत. या घटनेचा अधिक तपास करताना पोलिसही हादरले आहेत.
बीरेंद्र गुर्जर यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी आधी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी गुर्जर यांची पत्नीवर पोलिसांचा संशय गेला. अधिक चौकशी केल्यानंतर तिने तिचा गुन्हा कबूल केला आहे. बीरेंद्र गुर्जर यांची पत्नी कंचनने हत्येचा खुलासा करताच पोलिसही हादरले आहेत. कंचनने सांगितल्याप्रमाणे, तिचा पती नशेत असताना तिचा छळ करत होता. त्यामुळं वैतागलेल्या कंचनने पतीचा जीव घेतला. सतत पाठलाग करायचा, वैतागलेल्या तरुणीने मित्रांना सांगितलं, अन् CSMT स्थानकात घडला एकच थरार २१ फेब्रुवारी रोजी जेवणात झोपेच्या २० गोळ्या मिसळल्या होत्या. त्यानंतर बीरेंद्र गाढ झोपेत असताना महिलेने त्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर धारदार शस्त्राने गुप्तांगावर वार करत पतीचा निर्घृणपणे जीव घेतला. पतीची हत्या केल्यानंतर कंचनने मृतदेहाला कपड्यात गुंडाळून रस्त्यालगत फेकले. इतकंच नव्हे तर, पुरावे मिटवण्यासाठी मृतकांचे कपडे व चप्पल जाळल्या.