नवी दिल्ली : डीजीसीए अधिकारी अजय पाल सिंग आणि त्यांची पत्नी मोनिका यांनी काही तासांच्या कालावधीत एकामागून एक आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या हसत्या खेळत्या दाम्पत्याला टोकाचं पाऊल उचलण्यास कुठल्या गोष्टीने प्रवृत्त केले याबद्दल त्यांचे कुटुंबीय अंधारात आहेत. दोघांचा गेल्या वर्षीच विवाह झाला होता.

मोनिकाच्या कुटुंबीयांना गुरुवारी तिचा फोन आला होता. मोनिकाचा भाऊ सौरभने सांगितले, की ‘सकाळी १२-१२.३० वाजताच्या सुमारास मोनिकाने आमच्या वडिलांना फोन केला, की अजयने काहीतरी विषारी पदार्थ इंजेक्ट केल्याचे तिने सांगितले. माझ्या वडिलांनी तिला अजयला तातडीने रुग्णालयात नेण्यास सांगितले… मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. आम्ही भोपाळहून विमानाचे तिकीट शोधत होतो, पण रात्री एकही तिकीट उपलब्ध नव्हतं. त्यामुळे आम्ही सकाळी दिल्लीला जायचं ठरवलं. मात्र, दोन-तीन तासांतच तिनेही आत्महत्या केल्याचं समजलं आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने आम्हाला काहीतरी सांगितले असतं, तर आम्ही तिला मदत करु शकलो असतो, अशी हताश प्रतिक्रिया मोनिकाचा भाऊ सौरभने दिली

“तिने ना कोणाची वाट पाहिली, ना साधा कोणाला फोन केला. अजयचा मृत्यू झाल्यानंतर, ती घरी परतली आणि तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. पोलिसांनी आम्हाला सांगितले की तिने काही मिनिटांतच आत्महत्या केली. काय चालले आहे हे आम्हाला कळायला हवे होते. त्यांना जीव का द्यावा लागला, हेच समजत नाही” असं मोनिकाचे वडील डॉ प्रेम किशोर म्हणाले.

२१ वर्षीय तरुणीने लग्नानंतर वर्षातच आयुष्य संपवलं, पतीच्या ‘त्या’ मागणीमुळे टोकाचं पाऊल?
मोनिका कधी कधी कॉलवर पती अजयसोबत होणाऱ्या भांडणांचा उल्लेख करायची, पण काही “गंभीर” वाटले नव्हते. दोघांनी गेल्या आठवड्यात मोनिकाचा वाढदिवस साजरा केला आणि सर्व काही सुरळीत सुरु होते, असेही तिच्या आईने सांगितले.
झोपेत अंदाज चुकला, गच्चीवरुन थेट खाली पडून तरुणाचा मृत्यू, नातवाला पाहून आजीचा आक्रोश
अजयच्या कुटुंबीयांनी सांगितले की, गेल्या महिन्यात त्याने आपसातील भांडणांबद्दल काही वेळा सांगितलं होतं. त्याचा मोठा भाऊ योगेंद्र म्हणाला की “मी बुधवारी दुपारी त्याच्याशी शेवटचे बोललो. जेवण आणि घरातील कामं यासारख्या छोट्या छोट्या मुद्द्यांवरून दोघं नवरा बायको कधी कधी वाद घालत असत. मी त्याला होळीच्या सुट्टीत घरी यायला सांगितले होते. मला वाटले की आम्ही त्यांच्यातील वाद सोडवू शकू, कारण काहीही मोठे वाटले नव्हते. अजयने मला आश्वासन दिले होते की तो सुट्टीत येईल, मात्र त्याआधीच सगळं संपलं” असंही अजयचा दादा म्हणाला.

वडील टेम्पो चालक,आई शिवणकाम करायची; मुलाची जिद्द, दुसऱ्यांदा MPSC परीक्षेत टॉप; थेट DYSP पदावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here