रत्नागिरी/संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्द येथील पुलाजवळ दुचाकीचा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश रामचंद्र तोरस्कर (वय ४५ वर्ष, रा. कासारकोळवण) असे त्यांचे नाव आहे. ते कासारकोळवण येथून दुचाकीने बेलारी हायस्कूलकडे जात होते. बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. एका बाईकस्वाराला शिक्षकाची दुचाकी पडलेली दिसली. त्याने नदीजवळ पाहिलं असता गुरुजी विव्हळत पडलेले दिसले. तोरस्कर यांच्या निधनाने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

ते सकाळी शाळेत निघाले असताना त्यांचा अपघात होऊन ते शेजारी असलेल्या नदीजवळील दरीत पडले होते, मात्र रस्त्याशेजारी असलेली गाडी पाहून मागून येणाऱ्या एका व्यक्तीला दिसल्याने त्यांनी गाडी थांबवून ही गाडी कोणाची आहे याचा शोध घेतला असता शेजारी नदीत पडलेले शिक्षक त्याला दिसून आले. यावेळी हे शिक्षक कसारकोळवण येथील असल्याची माहिती या व्यक्तीला होती. त्यांनी मागून येणाऱ्या एसटीमधून कासार कोवळ येथील असलेल्या ग्रामस्थांना उतरून या सगळ्या घटनेची माहिती गावात दिली. मात्र हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्यापही समजू शकलेलं नाही.

झोपेत अंदाज चुकला, गच्चीवरुन थेट खाली पडून तरुणाचा मृत्यू, नातवाला पाहून आजीचा आक्रोश
याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश तोरस्कर हे बेलारी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या दुचाकीने (एमएच ०८ वाय ५२९९) गुरुवारी सकाळी कासार कोळवण येथून बेलारी हायस्कूलकडे जात होते. यावेळी पुलाजवळ उतारावर अपघात झाला. या अपघाताची खबर नीलेश विजय माईन (वय २६, रा. निवे खुर्द माईनवाडी) याने देवरूख पोलिस ठाण्यात दिली.

सर्वांच्या सुखदुःखाला धावणारा गणेश गेला, बाईक अपघात मृत्यू, चिमुकल्यांचं पितृछत्र हरपलं
अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी पंचनामा केला. शांत, संयमी व सत हसतमुख असणाऱ्या शिक्षक प्रकाश तोरस्कर यांच्या अपघाती निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, विवाहित बहीण, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे अधिक तपास हवालदार संजय मारळकर करीत आहेत.

थोडक्यात बचावलो,गाडी दरीत गेली असती; घाटात एसटीचा ब्रेक फेल, ४० प्रवासी बसलेले, चालक ठरला देवदूत

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here