सोने-चांदीचा आजचा भाव काय?
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) २४ कॅरेट सोन्याचा भाव ५५ हजार ८९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर खुला झाला. तर यानंतर सोन्याच्या किमतीत काहीशी नरमाई दिसली असून सकाळी १०.३८ वाजता सोन्याचा भाव ५५,८२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होता. तसेच काल सोन्याचा भाव ५५ हजार ७३९ रुपयांवर क्लोज झाला होता.
दुसरीकडे, ३ मार्च म्हणजे शुक्रवारी चांदीची चमकही वाढली आहे. आज वायदे बाजारात चांदीचा भाव तेजीत व्यवहार करत असताना आज ९९९ शुद्धतेच्या चांदीचा भाव बाजार उघडल्यानंतर ६४ हजार ३२२ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. तर १०.३८ मिनिटांवर त्याच्या किंमतीत आणखी मजबूती दिसून आली आणि सध्या ते ६४,४६७ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. याशिवाय काल गुरुवारी चांदीचा भाव ६४,०३४ रुपयांवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातील आजची स्थिती
याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे तर सोन्याचा दर खालच्या पातळीवरून आज किंचित मजबूत झाला आहे, पण आजही त्यात घसरण होत आहे. आज सोन्याच्या भावात ०.२७ टक्के घसरणीसह $१,८४०.५० प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तर चांदीच्या दरातही घट झाली असून आज सफेद धातू ०.९२ टक्क्यांनी पडून $२०.९०१ प्रति औंस वर व्यवहार करत आहे.