सिंधुदुर्ग: ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत जिल्ह्यात काही नियम शिथील करण्यात आले असून लॉकडाऊनचा कालावधी मात्र ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. दरम्यान, सिंधुदुर्गात हा सर्वात मोठा सण असतो. यंदा गणेशोत्सव काळातही असणार हे स्पष्ट झाल्याने नियमांच्या बंधनात राहूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. ( )

वाचा:

मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्ह्यात विविध सेवा, अटी व शर्तींसह नियमांचे पालन करून सुरू राहणार आहेत. यापूर्वी परवानगी देण्यात आलेली दुकाने, सेवेची ठिकाणे यापुढेही सुरू राहणार आहेत. जिल्ह्याअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेने, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण व स्वच्छता विषयक उपाययोजना याच्या अधीन राहून सुरू राहतील. जिल्हा बंदी कायम असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्वी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील. जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या कालावधीत सुरू राहतील. मॉल आणि व्यापारी संकुले दिनांक ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. यामध्ये नाट्यगुहे, प्रेक्षागृहे (थीएटर्स) फुड कोर्ट व उपहारगृहे यांचा समावेश नसेल. तथापी मॉल मधील उपहार गृहातील स्वयंपाकगृह फक्त घरपोच सेवेसाठी सुरू राहील. या बाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने लागू केलेले नियम व अटी लागू राहतील. लग्न समारंभ, खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल २३ जून रोजीच्या निर्बंधासह चालू राहतील.

वाचा:

मोकळ्या मैदानावरील व्यायाम निर्बंधासह सुरू राहतील. वर्तमानपत्राची छपाई, वितरण हे घरपोच सेवेसह सुरू राहील. शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी (विद्यापीठे, महाविद्यालय, शाळा) शिकविण्याव्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज जसे ई-साहित्याचा विकास, उत्तपत्रिकाची मूल्यांकन, निकालाची घोषणा यासाठी सुरू राहतील. सलून, ब्युटीपार्लर्स, स्पा हे राज्य शासनाच्या २५ जूनच्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील. गोल्फ कोर्स, आऊट डोअर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन व मल्लखांब या सारख्या मैदानी खेळांना दिनांक ५ ऑगस्टपासून समाजिक अंतर, निर्जंतुकीकरण याच्या अधीन राहून सुरू करता येतील. मात्र जलतरण तलाव चालविण्यास परवनागी असणार नाही.

वाचा:

दुचाकीवर दोन व्यक्ती मास्क व हेल्मेटसह, तीन चाकीमध्ये तीन व्यक्ती व चार चाकी वाहनामध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान ६ फूट ठेवावे. दुकानात ग्राहकांची संख्या एकावेळी ५ पेक्षा जास्त असणार नाही व योग्य त्या सामाजिक अंतराचे पालन केले जाईल, याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित दुकानदार व आस्थापना चालक यांची असणार आहे. गर्दी होणारे कोणतेही कार्यक्रम करणे, संमेलन, मेळावे, परिषद यांना बंदी राहील. विवाहासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेऊन ५० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल. तसेच अंत्यविधीसाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकण्यास बंदी असून त्यासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान करण्यास मनाई आहे.

वाचा:

शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करावे. कामाच्या ठिकाणी, कार्यालय, दुकाने, बाजारपेठा व औद्यौगिक व व्यावसायिक अस्थापना येथे कामाच्या वेळेत योग्य ते अंतर ठेवावे, जेणे करून गर्दी होणार नाही. सर्व प्रवेश व निर्गम स्थानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅन्डवॉश उपलब्ध करुन देण्यात यावेत. सर्व कामाच्या ठिकाणाचे सार्वजनिक सुविधाचे आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व ठिकाणाचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे. कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जाईल, याची दक्षता घ्यावी. कंटेन्मेंट झोनमध्ये शिथील करण्यात आलेले नियम लागू राहणार नाहीत. वरील सर्व बाबी तसेच यापूर्वीच्या आदेशाने परवानगी देण्यात आलेल्या बाबी वगळता इतर सर्व बाबी प्रतिबंधीत राहणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.

संदेश पारकरही करोनामुक्त

कणकवलीचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते संदेश पारकर हे करोनामुक्त झाले असून जिल्हा रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले. शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर संदेश पारकर यांनाही करोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. आता पारकर आणि नाईक दोघेही ठणठणीत बरे झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या ३६४ एवढी झाली आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here