करणकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं एनोसनं सांगितलं होतं, असा दावा वर्गिस यांच्या कुटुंबीयांनी केला. करण आपल्याला त्रास देत असल्याचा एनोसनं सांगितलं होतं, अशी माहिती पोलिसांकडे असलेल्या काही जबाबांमध्येदेखील आहे. ‘मी तुम्हाला भेटू शकत नाही. मला मोकळा वेळच मिळत नाही. मला करण खूप त्रास देतो, असं एनोस त्याच्या मित्रांना सांगायचा. मात्र यामुळे त्यानं आत्महत्या केली किंवा त्याची हत्या झाली हे सिद्ध करण्यासाठी सध्या तरी पुरेसे पुरावे नाहीत,’ असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
समुद्रात उडी मारण्याच्या काही दिवस आधी वर्गिसची प्रकृती ठीक नव्हती. करणनं त्याला रुग्णालयातही नीट नव्हती, अशी माहिती काही जबाबांमध्ये आहे. करणच्या टिममध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. ‘रेलिंग ४ फूट उंच आहे. त्यामुळे एनोस पाय घसरुन, तोल जाऊन पडला असावा अशी शक्यता नाही. रेलिंगची उंची पाहता एखाद्यानं त्याला खाली ढकललं असावं याचीही शक्यता नाही. एनोसकडे रिंग्स फेकण्यात आल्या. मात्र त्यानं त्या रिंग्सना पकडलं नाही,’ अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.
आत्महत्या करण्यापूर्वीच्या काही मिनिटांमधलं एनोसचं वर्तन अतिशय वेगळं आणि विचित्र असल्याचं ओएनसीजीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. एनोस अतिशय विचित्रपणे वागत होता. त्याला एखादा मानसिक त्रास असावा असं वाटत होतं. मात्र भूतकाळात त्याचं वर्तन असं कधीच नव्हतं, अशीही माहिती त्यांनी दिली. ‘वर्गीस यांचा मृतदेह शोधणं आव्हानात्मक आहे. ते जिवंत आहेत की नाहीत, याबद्दल कोणतीच खात्रीशीर माहिती नाही. त्यामुळे एफआयआरमध्ये तशी कलमही दाखल करता येत नाही,’ असं अधिकारी म्हणाले.
ongc engineer suicide, तो कपडे काढून फिरत होता, मग समुद्रात उडी मारली! ONGCच्या इंजिनीयरसोबत काय घडलं? – ongc employee death enos varghese was seen naked minutes before he jumped to his death
मुंबई: ओएनजीसी कंपनीचा कर्मचारी असलेल्या अभियंत्यानं २४ जानेवारीला समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. एनोस वर्गिस असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कंत्राटी अभियंते म्हणून वर्गिस ओएनजीसीमध्ये काम करत होते. समुद्रात उडी मारण्याच्या आधी ते कपडे काढून फिरताना दिसले होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.