मुंबई : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या सर्वच शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. परंतू आता हा प्रभाव कमी होताना दिसत आहे. आज समूहातील १० पैकी सहा कंपन्यांचे शेअर्सने अप्पर सर्किटला लागला असताना उर्वरित चार कंपन्यांच्या शेअर्समध्येही चांगली तेजी नोंदवली गेली.

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे घसरणीचा जबरदस्त फटका बसलेल्या अदानी समूहाला अमेरिकन गुंतवणूक कंपन्यांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. अमेरिकन गुंतवणूक कंपनी GQG Partners ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये १५,४४६ कोटीची मोठी गुंतवणूक केली असून गोल्डमन सॅक्सने ११३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या दोन्ही मोठ्या व्यवहारांचा परिणाम आज अदानी समूहाच्या कंपन्यांवर दिसून येत आहे.

Adani Stake Sale: Hindenburg संकटातही गौतम अदानींना पाठिंबा देणारी ती व्यक्ती कोण? जाणून घ्या
अदानी समूहाचे शेअर्स
अदानी पॉवर १६९.४५ रुपये, अदानी ट्रान्समिशन ७४३.७५ रुपये, अदानी ग्रीन एनर्जी ५६२ रुपये, अदानी टोटल गॅस ७८१.८५ रुपये, अदानी विल्मर ४१८.३० रुपये आणि एनडीटीव्ही २२०.१० रुपये या सर्व शेअर्सने पाच टक्क्यांच्या वाढीसह अप्पर सर्किटला स्पर्श केला. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस बीएसईवर १०.२० टक्क्यांनी वाढून १७७०.६० रुपयांवर अदानी पोर्ट्स ६.१९ टक्क्यांनी वाढून ६६१.८० रुपयांवर, एसीसी ३.२६ टक्क्यांनी १८६०.७५ रुपयांच्या वाढीसह आणि अंबुजा २४.३८ रुपयांवर व्यवहार करत असून त्यात ३.६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हिंडेनबर्गच्या भोवऱ्यात अडकलेल्या अदानींनी चार कंपन्यांचे भागभांडवल विकले, जाणून घ्या कोणी विकत घेतले
मोठ्या व्यवहारामुळे आज अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत गोल्डमन सॅक्स आणि जीक्यूजी पार्टनर्सने कोणत्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत याबाबत गुंतवणूकदारांमध्ये कुतूहल आहे. Goldman Sachs ने अदानी ग्रीन एनर्जीचे २,२५,२२,८५० कोटी शेअर्स ५०४.६० च्या किमतीत खरेदी केले आहेत म्हणजेच सुमारे ११३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

GQG पार्टनर्सने अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यापैकी ५४६० कोटी रुपये अदानी एंटरप्रायझेसमध्ये, ५२८२ कोटी रुपये अदानी पोर्ट्समध्ये, १८९८ कोटी रुपये अदानी ट्रान्समिशनमध्ये आणि २८०६ कोटी रुपये अदानी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here