कोहिमा: नागालँड विधानसभा निवडणुकीत नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भारतीय जनता पक्षानं सत्ता राखली आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. पैकी एनडीपीपीनं २५ आणि भाजपनं १२ जागा जिंकल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ७ जागा जिंकत इतिहास रचला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीनं साडे नऊ टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेतली. गेल्या निवडणुकीत केवळ १ टक्का मतं घेणाऱ्या राष्टवादीनं यंदा सुसाट कामगिरी केली.

विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी किमान १० टक्के जागा जिंकाव्या लागतात. नव्या विधानसभेत राष्ट्रवादीचे ७ आमदार असतील. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते मिळेल. राष्टवादीचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र वर्मांनी नागालँडमध्ये विशेष लक्ष घातलं होतं. पवारांचे विश्वासू मानले जाणारे वर्मा विद्यार्थीदशेपासून राजकारणात आहेत. १९८८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली एनएसयूआयनं राज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील भारतीय विद्यार्थी सेना आणि भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धूळ चारली होती.
चिंचवडमध्ये गमावलं, नागालँडमध्ये कमावलं; राष्ट्रवादीची ऐतिहासिक सप्तपदी, भाजपची दाणादाण
मुंबई राष्ट्रवादीचं अध्यक्षपद भूषवलेल्या नरेंद्र वर्मांकडे २०१४ मध्ये शरद पवारांनी मणीपूर, आसाम, मेघालय, नागालँड आणि गोव्याची जबाबदारी दिली. गेल्या १० वर्षांतील कामाचं फळ राष्ट्रवादीला या निवडणुकीत मिळाल्याचं वर्मांनी सांगितलं. ‘गेले ४ महिने मी नागालँडमध्ये फिरत आहे. विशेषत: पूर्व भागात अधिक फिरलो. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही लवकरच आमदारांची बैठक घेऊन विरोधी पक्षनेता ठरवू,’ असं वर्मांनी सांगितलं.

काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसताना राष्ट्रवादी विरोधी बाकांवरील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आमच्या दृष्टीनं ही खूप मोठी बाब आहे. आम्ही १२ जागा लढवल्या. त्यातील ७ मतदारसंघात आमचे उमेदवार जिंकले. पाच जागा आम्ही कमी मताधिक्क्यानं गमावल्या, असं वर्मा म्हणाले.
दे धक्का! आधी पाठिंबा दिला, मग त्यांचाच उमेदवार पाडला; आठवलेंनी नागालँडमध्ये इतिहास घडवला
शरद पवारांनी काँग्रेसला रामराम करून स्वत:चा पक्ष स्थापन केला, त्यावेळी पी. ए. संगमादेखील त्यांच्या सोबत होते २०१३ पर्यंत संगमांनी राष्ट्रवादीचं काम केलं. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. संगमा यांच्यामुळे राष्ट्रवादीला या भागात फायदा झाला. पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाला. शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना प्रफुल पटेल यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रीपद होतं. त्याचाही फायदा पक्षाला नागालँडमध्ये झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here