जळगाव : काम संपल्यानंतर घराकडे परतत असताना दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका दुचाकीवरील दोन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कानळदा रोडवरील के.सी.पार्कजवळ मंगळवारी रात्री घडली होती. यातील धडक झालेल्या दुसऱ्या दुचाकीवरील जखमींपैकी एका तरुणाचाही उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी अडीच वाजता मृत्यू झाला आहे. अमोल प्रकाश विसपूते (वय ३० रा, कांचन नगर, जळगाव) असं मयत तरूणाचं नाव आहे.

जळगाव शहरापासून कानळदा येथील के.सी.पार्क जवळ मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा अपघात झाला होता. दुचाकीवरील गणेश सोमा सपकाळे (वय ३२ रा, आमोदा खुर्द ता.जि.जळगाव) याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याच्यासोबतचा मित्र समाधान बाविस्कर (रा, आमोदा खुर्द ता.जळगाव) हा तसेच धडक देणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवरील जितेंद्र एकनाथ चौधरी आणि अमोल प्रकाश विसपूते (रा, कांचन नगर, जळगाव) असं तिघेजण गंभीर जखमी झाले होते.

नितेश राणे मोठ्या उत्साहाने बोलण्यासाठी उभे राहिले, पण विधानसभाध्यक्ष म्हणाले, ‘तुम्ही उशीरा आलात, सगळं झालंय’
यातील अमोल प्रकाश विसपूते याच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी अडीच वाजता अमोल याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्याची प्राणज्योत मालवली. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कांचन नगरातील मित्र परिवार व नातेवाईकांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.

कंपनी बंद असल्याने मित्रासोबत गेला आणि अपघात झाला

मयत अमोल हा रेमंड कंपनीत कंत्राटी पध्दतीने कामाला होता. गेल्या पाच दिवसांपासून रेमंड कंपनी बंद असल्याने अमोल घरीच होता. तो मित्रासोबत बाहेर गेला होता. तेव्हा हा अपघात घडला. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र सोनार करत आहेत. दरम्यान, यातील इतर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

निराशेचे मळभ हटले! अदानींसाठी दुसरी गुड न्यूज, १२० मिनिटांत ३,९४,७६,४०,००,००० कोटींची कमाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here