अशा स्थितीत जर तुम्ही देखील छोट्या गुंतवणुकीसह क्रॉपती बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर म्युच्युअल फंडातून गुंतवणूकीचा एक फॉर्म्युला आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जेणेकरून तुम्ही कमीत-कमी कालावधीत कोटींचा फंडा उभा करू शकता. इथे आपण म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवण्यापासून मिळणार्या परताव्याचे गणित जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करू शकतात.
आर्थिक लक्ष्य निश्चित करा
तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात करता तेव्हा त्यापूर्वी आर्थिक लक्ष्य निश्चित केले पाहिजेत. यामुळे तुम्हाला हे समजणे सोयीचे होते की तुम्हाला किती निधी हवा आहे, त्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर दीर्घकाळ नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही कोट्याधीश बनू शकता.
कोट्याधीश बनण्याचा कालावधी
तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर १२% परतावा मिळतो, त्यानुसार तुम्हाला १५ वर्षांसाठी दरमहा २०,००० रुपये एसआयपी जमा करावा लागेल. म्युच्युअल फंडामध्ये १२ टक्के परतावा सामान्य असून सरासरी तुम्हाला इतका परतावा सहज मिळू शकतो. अशाप्रकारे, १५ वर्षात तुम्ही ३६ लाख रुपये गुंतवले, तर त्यावर तुम्हाला सुमारे ६५ लाखांचा परतावा मिळेल आणि तुम्ही कोट्याधीश व्हाल.
जास्तीत जास्त लाभासाठी दीर्घकालीन गुंतवणूक योजना
जर तुम्ही कमी रक्कम गुंतवून करोडपती व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्ही दीर्घकालीन योजना निवडणे गरजेचे आहे. कारण म्युच्युअल फंडांद्वारे जलद कोट्याधीश बनण्यासाठी तुम्हाला अधिक गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन योजना निवडली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. समजा तुम्ही गुंतवणुकीसाठी २५ वर्षाच्या कालावधीची योजना निवडली तर तुम्हाला दरमहा फक्त ८ हजार रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे तुम्हाला एक कोटींहून अधिक परतावा मिळेल.