सोलापूर : दरवर्षी आमलिका एकादशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. आमलिका एकादशी निमित्त पुणे येथील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल १ टन द्राक्षांची सजावट केली. आजच्या आमलिका एकादशी निमित्त विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या चौखांबीमध्ये १ टन द्राक्ष वापरून मनमोहक अशी आरास करण्यात आली होती. बाबासाहेब रामचंद्र शेंडे (बारामती), पुनम बाबासाहेब शेंडे (बारामती), सचिन आण्णा चव्हाण (पुणे) यांनी १ टन द्राक्षे मंदिराला आराससाठी दान दिले होते. पण केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाली. यामुळे विठ्ठल मंदिर परिसरात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आज सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांना दर्शन सुरू झाले आणि अर्ध्या तासात १ टन द्राक्षापैकी एकही मणी शिल्लक राहिला नव्हता.

विठ्ठल मंदिर परिसरात चर्चेला उधाण; अर्ध्या तासात १ टन द्राक्षे गायब

दर्शनाला आलेल्या भाविकांनी ही द्राक्षे खाल्ल्याचा दावा काही जणांनी व्यक्त केला आहे. पण दर्शन रांगेच्या बाहेर लावलेले शेकडो द्राक्ष घड कोणी पळवले? याची चर्चा विठ्ठल मंदिर परिसरात सुरू आहे. द्राक्ष हा विषय साधा असला तरी मंदिरात ज्या पद्धतीने हा प्रकार घडला आहे याची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. ज्या भाविकांनी सजावटीसाठी द्राक्ष दिले त्यांच्याही भावना या प्रकाराने दुखावल्या आहेत. या प्रकारात नेमके कोण आहे? याचा शोध मंदिर प्रशासनाने तातडीने लावावा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, अशी अपेक्षा विठ्ठल भक्तांची आहे.

सकाळी ६ वाजता आरास केली, ६.३० वाजता द्राक्ष गायब

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी आमलिका एकादशी निमित्त सकाळी सहा वाजता १ टन द्राक्षाची आरास करण्यात आली. आरास केल्यानंतर मात्र अवघ्या अर्ध्या तासात ही सर्व द्राक्ष मंदीरातून गायब झाली आहेत. ही द्राक्ष मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नेल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. मात्र काही भाविकांनी कर्मचाऱ्यांनीच ही द्राक्ष नेल्याचा आरोप केला आहे. यामुळे नेमकं द्राक्ष कोणी नेली? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आमलकी एकादशी; विठ्ठल-रुक्‍मिणी गाभारात एक टन काळ्या-पिवळ्या द्राक्षांची आरास

सण समारंभात विठ्ठल मंदिरात आरास

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सण-समारंभ तसेच एकादशीच्या निमीत्ताने विविध प्रकारची आरास करण्यात येते. यापूर्वी फुलांची, अननसची आणि संत्र्याची आरास करण्यात आली होती. ही फळांची आरास दिवसभर ठेवली जाते जेणेकरून भाविकांना ती पाहाता येईल. दुसऱ्या दिवशी आरासची फळे भाविकांना दिली जातात. आजही द्राक्ष आरासनंतर भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार होती. मात्र आरास केल्याच्या अर्ध्या तासातच सर्व १ टन द्राक्ष गायब झाली. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
मंत्री दादा भुसेंनी २ रुपयांचा चेक घेऊन बोलवलं; संतप्त शेतकरी म्हणाला, ‘काय थट्टा लावलीय’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here