पुणे : मद्यधुंद अवस्थेत एस.टी बस चालवणं अनेकांना महागात पडलं आहे. त्यात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. मात्र, असाच काहीसा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरंदर तालुक्यातील पंढरपूर पालखी मार्गावर एक एस.टी चालक मद्यधुंद अवस्थेत एस.टी चालवत होता. कधी दुभाजकाला कट मारणे, कधी भरधाव वेगाने पळवणे तर कधी नागमोडी बस चालत होती. त्यानंतर थोपटेवाडी फाटा येथे डांबरी रस्ता सोडून साईडपट्टीवरून सुसाट वेगात चाललेली बस प्रवाशांनी बोंबाबोंब करुन थांबवली आणि पुढील दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – स्वारगेट – सांगोला बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी ३५८४ ही बस स्वारगेट बस स्थानकातून निघताच दुभाजकाला धडकली. त्यानंतर भरधाव वेगात असा प्रवास सुरु होता. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे गेटपासून बस नागमोडी चालू लागली. एक क्षणाला तर समोरुन येणाऱ्या ट्रकला कटही लागला. त्यानंतर बस डांबरी रस्ता सोडून थेट साईडपट्टीवरून चाल लागली. यामुळे प्रवासी भयभीत झाले.

सत्तेतून पायउतार झाल्यामुळे आमची चांगली कामही दिसत नाहीत; मुख्यमंत्र्यांचे अजितदादांना चिमटे

आता प्रवाशांच्या लक्षात आले बहूतेक चालक दारु पिऊन बस चालवत आहे आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. प्रसंगावधान दाखवत लागलीच प्रवाशांनी बोंबाबोंब केली. बस वाहकाने चालकाला बस थांबण्याची विनंती केली. नागरिकांनी आरडाओरड केल्यानं चालकाने बस थांबवली. त्यानंतर एसटीच्या वाहतूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेऊन नीरा पोलिसांच्या ताब्यात दिले.

सहाय्यक वाहतूक निरिक्षक कमर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित तपासणी करताना पालखी मार्गावर ५२ प्रवाशी घेऊन सांगोला आगाराची स्वारगेट – सांगोला बस रस्त्याच्या खाली जाऊन थांबली होती. अशा अवस्थेत बस का उभी आहे? असं लक्षात येताच बसमध्ये जाऊन पाहिले तर चालक संतोष विश्वंभर वाघमारे (वय ३२, रा. लातूर डेपो सांगोला) हा मद्यधूंद अवस्थेत आढळून आला. सोबत वाहक प्रविण बुरंजे (सांगोला डेपो) हे होते. प्रवाशांनी चालक दारु पिऊन बस चालवत असल्याची तक्रार केल्याने चालकाला ताब्यात घेत नीरा पोलिसांच्या ताब्यात दिले.

एक पराभव आणि सर्व काही संपणार! खरच टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचेल का? असे आहे उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here