मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अ‍ॅमेझॉन पे (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनावर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने कंपनीवर ३.०६ कोटी रुपयांहून अधिक दंड आकारला आहे. हा दंड प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्स (PPI) आणि नो यूअर कस्टमरशी (KYC) संबंधित काही तरतुदींचे पालन केले गेले नसल्याच्या कारणावरून ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने या कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. काही नियमांचे पालन न करण्याबाबत कंपनीला दंड का ठोठावला जाऊ नये, असे या नोटिशीत म्हटले आहे. यानंतर कंपनीचे उत्तर आल्यानंतर शेवटी आरबीआयने कंपनीला दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा दंड नियमांचे पालन करण्यात कसूर करण्यात आल्याने लावण्यात आला असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. अ‍ॅमेझॉन पेने (इंडिया) आपल्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही देवाणघेवाण किंवा करारावर टिप्पणी करणे असा नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. अ‍ॅमेझॉन पे ही अमेरिकेतील ई-कॉमर्स मोठी कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनची डिजिटल पेमेंट प्रोसेसिंग सेवा आहे.

मुलगा सतत द्यायचा त्रास, कंटाळलेल्या पित्याने मुलाचा कायमचा काढला काटा, केलेले कृत्य पाहून सारेच हादरले
किती आहे भागीदारी

देशात यूपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये फोन पे, गूगल पे आणि पेटीएमचा दबदबा आहे. National Payments Corporation of India च्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात देशात एकूण बाजारात त्यांची भागीदारी ९६ टक्के इतकी होती. यात सर्वात मोठी हिस्सेदारी फोनपेची आहे.

वितभर पोटासाठी गमावला जीव! समृद्धी महामार्गावर चहा विकायला गेला, मागून आला भरधाव टँकर आणि…
सर्वात मोठी हिस्सेगारी फोन पे कडे

फोनपेकडे सुमारे ५० टक्के बाजारात हिस्सेदारी आहे. यानंतर गूगल पेचा क्रमांक लागतो. गूगल पेकडे ३४.३४ टक्के बाजार हिस्सेदारी आहे.पेटीएमकडे १४.९४ टक्के आणि CRED Pay १.८ टक्के होती. अ‍ॅमेझॉन पेसह इतर कंपन्यांची हिस्सेदारी सुमारे ३.५ टक्के होती.
चुना आयोग, पानटपरीवाला, रिक्षावाला, कोंबडीचोर; सुषमा अंधारेंचा भाजप, बच्चू कडूंवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here