दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील
ईद-उल-अजहानिमित्त मी बांगलादेशी नागरिक आणि सरकारला हार्दिक शुभकामना देऊ इच्छितो. हा सण भारताच्या प्रत्येक भागात साजरा केला जातो. हा सण आम्हाला आमच्या दृढ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांची आठवण करून देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हा सण आमच्या समाजात शांती आणि सहिष्णुतेची भावना वृद्धिंगत करेल, तसेच दोन्ही देशांचे संबंध देखील अधिक मजबूत करेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात पुढे लिहिले आहे.
करोनाविरोधातील लढाईसंदर्भात भारताची केली प्रशंसा
कोविड-१९ संदर्भात चर्चा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि हे दोन्ही देश कोविड-१९ शी लढा देत आहेत. आपल्या सक्षम नेतृत्वात बांगलादेशात केलेल्या प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करत आहोत. मला विश्वास आहे की या आव्हानात्मक वेळेवर बांगलादेश नक्कीच विजय प्राप्त करेल. आफण आरोग्य क्षेत्रात क्षमता निर्माण करत आहात, या आणि अशा इतर कोणत्याही आपल्या प्रयत्नांचे समर्थन करण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध असू, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान शेख हसीना यांना दिला.
वाचा:
भारताप्रमाणेच बांगलादेशात बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ईद-उल-फितरनंतर मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे बकरी ईद. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदीचे विशेष असे महत्त्व आहे. सध्या जगभरात करोनाचे सावट असल्यामुळे बकरी ईद हा सण साजरी करण्याला मर्यादा आल्या आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I really like and appreciate your blog post.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.