टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने वाहतूक पोलीस रणजीत सिंह यांना त्यांची वाहतुकीचे नियमन करण्याची पद्धत कशी आहे याबाबत विचारले होते. त्यानंतर सिंह यांनी रोहितला आपली ही पद्धत दाखवली. जेव्हा होळकर स्टेडियममधून टीम इंडियाची बस बाहेर निघाली तेव्हा रणजीत सिंह यांची मेन गेटजवळ ड्यूटी सुरू होती. बस येत आहे हे पाहून सिंह यांनी डान्स करायला सुरूवात केली. यावेळी विराट कोहली हसत होता आणि रोहित शर्मा उभे राहून टाळ्या वाजवत होता. रणजीत सिंह यांनीही सलाम करत टीम इंडियाच्या खेळाडूंचा सन्मान केला.
खरे तर, इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे टीम इंडियाचे खेळाडू नाराज असताना वाहतूक पोलीस रणजीत सिंह यांनी आपल्या डान्सच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. त्यामुळ ेत्यांचे कौतुक होत आहे.
वाहतूक पोलीस रणजीत सिंह यांनी सांगितले की, कर्णधार रोहित शर्मा आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा यांनी मला सांगितले की आम्हाला तुमचा वाहतुकीचे नियमन करण्याची पद्धत पाहायची आहे. माझ्या या डान्समुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. असे असेल तर मग मी माझा डान्स का दाखवू नये, असे सिंह म्हणाले. सर्व भारतीय खेळाडूंनी सिंह यांचे स्वागत केले.