म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

करोना योद्ध्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या दलातील अनेक कर्मचाऱ्यांना ते कार्यरत असताना करोनाची बाधा होत आहे. त्यापैकी अनेकांना या लढाईत प्राणही गमवावे लागत आहेत. अंबरनाथमध्येही ५५ वर्षीय दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके या दोन जुळ्या भावांचा करोनामुळे एका आठवड्याच्या फरकाने मृत्यू झाला आहे. निवृतीला अवघ्या तीन वर्षांचा कालावधी शिल्लक असताना झालेल्या या जुळ्या भावांच्या मृत्यूमुळे अंबरनाथ आणि उल्हासनगर हिललाईन पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

करोनाच्या संकटकाळात लागू असलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीत गेले चार महिने पोलिस कर्मचारी आपल्या जिवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र बंदोबस्तासाठी तैनात आहेत. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस स्टेशनमध्ये तर जयसिंग घोडके हे अंबरनाथ पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. या दोन्ही जुळ्या भावांच्या निवृत्तीला अवघे तीन वर्षे शिल्लक होती. बंदोबस्तावर तैनात असताना काही दिवसांपूर्वी दोन्ही भावांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना २० जुलै रोजी दिलीप यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापाठोपाठ २८ जुलै रोजी जयसिंग यांचीही करोनाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके हे दोघे ५ ऑक्टोबर १९९१ या एकाच दिवशी पोलिस दलात भरती झाले होते. गेली २८ वर्षे पोलिस दलात सेवा करत असताना दोन्ही भावांनी जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनांमध्ये सेवा केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here