नांदेड : जादूटोणा आणि करणी केल्याच्या संशयावरुन ८५ वर्षीय वृद्धाला मारहाण करत त्याचा खून करण्यात आला. जीवाचा थरकाप उडवणारी ही घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी तिघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हणमंत पांचाळ असे या मयत वृद्धाचे नाव आहे. गावातील वामन डुमणे यांच्या १८ वर्षीय मुलीवर पांचाळ यांनी जादूटोणा आणि करणी केली, असा संशय डुमणे कुटुंबियांना होता. याच संशयावरुन डुमणे कुटुंबीयांतील तिघांनी एक मार्च रोजी ८५ वर्षीय हणमंत पांचाळ यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत हणमंत पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला. अंधश्रद्धेतून वृद्धाची हत्या झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


चिंचेच्या झाडाला बांधून मारहाण

आमच्या मुलीवर करणी आणि जादूटोणा का केलास, करणी केल्यामुळे मुलीच्या पायाला त्रास होत आहे, असे म्हणत आरोपींनी वृद्धास गावातील चिंचाच्या झाडाला बांधले आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली. जबर मारहाण केल्याने हणमंत पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल देखील झाला आहे.

बाबा दार उघडा, बाथरुममधून मुलगी ओरडत राहिली, पण सैतानाने क्रूरपणे बायकोला संपवलं

आरोपी विरोधात खून आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा

दरम्यान या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी रत्नदीप वामन डूमणे, वामन डूमणे आणि दयानंद डूमणे या तिघां विरोधात खून आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी अटक असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

बाबा, अजय बघा काहीतरी टोचून घेतोय, लेकीचा कॉल; नवऱ्यापाठोपाठ बायकोनेही स्वतःला संपवलं

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची अंनिसची मागणी

अंधश्रद्धेतून वृद्धाची खून करणे ही निंदनीय घटना आहे. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

शिक्षकानं विद्यार्थीनीचा पेपर हिसकावला; शहरप्रमुख महेश गायकवाडांचा कॉलेजमध्ये राडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here