याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तारीख खान ( वय २९ वर्ष) हे मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवाशी आहेत. कामानिमित्त ते पुण्यातील थेरगाव परिसरात राहतात. या ठिकाणी ते काचाचा बनवण्याचे काम करतात. तसेच त्यांची पत्नी जोहरूबी खान (वय २५ वर्ष) या गृहिणी आहेत.
थेरगाव परिसरात हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह गेल्या सहा ते सात महिन्यांपासून भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहेत. गुरुवारी दुपारी पती पत्नी हे मुलांसोबत घरात झोपले होते. सर्वजण गाढ झोपेत असताना त्यांचा धाकटा चिमुकला फैजल हा झोपतून उठला आणि रांगत रांगत त्या वीस लिटर भरून ठेवलेल्या बादली जवळ जाऊन पाण्यात खेळू लागला. मात्र खेळताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला.
मुलगा कुठे गेला, हे पाहण्यासाठी आई जोहारुब झोपेतून उठल्या, त्यावेळी त्यांना फैजल हा पाण्याच्या बादलीत पडलेला दिसला. त्यांनी जोरात आवाज देऊन पतीला झोपेतून उठवले. त्यानंतर त्यांनी फैजलला दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोटासाठी जीव गमावला लागला; समृद्धीवर चहा विकायला गेला अन् अपघात झाला, अपघातांचा रनवे