वाचा:
काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही दूध दरासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारनं एक बैठक बोलावली होती. त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार, किसान संघर्ष समितीबरोबरच भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष व रयत क्रांती संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाली आहे. रयत क्रांती संघटनेनं शुक्रवारी रात्रीच आष्टा-भिलवडी मार्गावर दुधाचा टँकर फोडून आक्रमक होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून दुधाचे टँकर अडवले जात आहेत, तर काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून निषेध केला जात आहे. त्यामुळं जिल्ह्या-जिल्ह्यांतील दूध संकलनावर परिणाम झाला आहे. येथे अकरा वाजता महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
आतापर्यंत काय-काय झाले?
पंढरपूर येथे रासपचे आमदार महादेव जानकर यांनी चंद्रभागा नदीत विठ्ठलाला दुधाचा अभिषेक घातला
गावागावात कार्यकर्ते दूध संकलन केंद्रावर जाऊन दूध घालण्यास विरोध करत आहे
मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर रयत क्रांती संघटनेचे टायर पेटवून आंदोलन
जिल्ह्यात कराड ते तासगाव मार्गावरही ‘रयत’च्या कार्यकर्त्यांनी फोडला दुधाचा टँकर
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचं आंदोलन. तिथं गावच्या चावडीवरील दगडाला घातला दुग्धाभिषेक.
भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी इस्लामपूर शहरात दुधाची गाडी अडवून लोकांना दूध वाटले
चंद्रकांत पाटलांच्या सूचना धाब्यावर
या आंदोलनात रस्त्यावर दूध फेकले जाणार नाही, टँकर अडवले जाणार नाहीत, दुधाचा अभिषेक घातला जाणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या मित्रपक्षांनी याला हरताळ फासत टँकर तर फोडलेच, शिवाय अनेक ठिकाणी दुग्धाभिषेक देखील घातला. यामुळे या आंदोलनाची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.