जालनाः समृध्दी महामार्गावर टायर फुटल्याने भरधाव कार पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात कारमधील एकजण ठार झाला असून तर उर्वरित ६ पैकी दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत.अमरसिंग शौकिलाल सिंग असे या अपघातातील मृताचे नाव आहे.

स्कार्पिओ कार क्रमांक यूपी. 91 एन 7517 पुण्यावरून समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे जात असताना चॅनल क्रमांक ३८० जवळ कारचे मागचे चाक अचानक फुटले. कारचा टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वेगात असलेली कार दोन्ही लेनच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकामध्ये जाऊन उलटली. या भयानक अपघातात कारमधील अमरसिंग शौकिलाल सिंग रा.बांदा,उत्तरप्रदेश यास गंभीर इजा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बांदा, उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेले बिरुसिंग, संजयसिंग शंकरसिंग, राजेशसिंग, भोलासिंग, सर्वेश कुमार राहुरी, दिलीपकुमार रामस्वरुप हे गंभीर जखमी झाले आहेत.

अनैतिक संबंधातून पतीचा काटा काढला; हत्येचे गूढ अखेर उकलले, ‘त्या’ व्हिडिओमुळं सत्य समोर
जखमी झालेल्यांपैकी दोघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभय दंडगव्हाळ, कर्मचारी कोकणे हे घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. गेल्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.

राज्यातील कफ सीरप कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात; ८४ कंपन्यांची चौकशी सुरू
उन्हाचा पारा वाढू लागल्याने महामार्गावर गाड्या चालवताना टायर मधील हवेचा दाब वारंवार तपासणे गरजेचे असून गाड्यांची गती व तापमान यामुळे गाडीच्या टायरमधील हवेचा दाब वाढत असल्याने टायर फुटण्याची शक्यता असते. समृद्धी महामार्गावरील गाड्या सुसाट वेगाने धावत आहे. त्यामुळे गाडी चालवताना योग्य ती काळजी घेणे जरुरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here