चिंचवडचा विजय जगताप पॅटर्नचा विजय आहे. तो भाजपचा आहे, असं म्हणता येणार नाही. चिंचवडच्या उमेदवा निवडीत, बंडखोर उमेदवाराला माघार लावण्यात यश आलं असतं तर निकाल वेगळा लागला असता, असं संजय राऊत म्हणाले.
पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला पण पुणेकर मतदार त्याला बळी पडले नाहीत. ते अभिनंदनास पात्र आहेत. मतदारांच्या घरात पेसे फेकण्यात आले. रवींद्र धंगेकर हे सामान्य कार्यकर्ते असल्यानं ते असं करु शकत नाहीत. लोकांनी धनशक्ती लाथाडली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचं कॅबिनेट कसब्यात मंत्रिमंडळ बैठका घेत बसलं होतं. कसबा तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है, असं संजय राऊत म्हणाले.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हा स्थानिक विषय होता. आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची चर्चा करतोय, असं संजय राऊत म्हणाले.
कायदा, न्यायालय, पोलीस हे पूर्णपणे खोक्यानं चिरडलेलं नाही. ४० आमदारांनी त्यांचं अंतरंग तपासावं, असं संजय राऊत म्हणाले. विधिमंडळाचा पूर्ण आदर करतो. ते विधान एका गटापुरतं ते होतं. एका फुटीर गटाबद्दल ते वक्तव्य केलं आहे. मी सध्या दौऱ्यावर असून ती नोटीस वाचावं लागेल, ती नोटीस वाचून उत्तर देईन, असं संजय राऊत म्हणाले. या देशात कोणत्याही व्यक्तीवर हल्ला होऊ नये, असं संजय राऊत म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, संजय राऊत शिवगर्जना यात्रेच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.