शेतकर्याची कन्या आज राज्यात प्रथम आल्याने माजलगाव सह संपूर्ण राज्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आयोगाने ४०५ पदांसाठी ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामधे प्रमोद चौगुले यांनी ६३३ गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला तर शुभम पाटीलला ६१६ गुण मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. महिलामध्ये सोनाली मात्रे पहिली आहे, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
सोनाली ही माजलगाव तालुक्यातील ईरला मजरा येथील रहिवाशी असून शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या आहे. सोनालीच्या रूपाने राज्यात एमपीएससी परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह एकूण २० पदांच्या ४०५ जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता ३ मार्च २०२३ ते १० मार्च २०२३ या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडून अभिनंदन
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माजलगाव ता.इरला मजला येथील शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या सोनाली मात्रे ही महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत तिने मिळविलेले हे यश नक्कीच अभिमानास्पद आह, असंही त्या म्हणाल्या.