मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे हल्ल्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. भांडूपमध्ये कोकण नगर या विभागातून या हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासासाठी ८ पथक तयार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. अशोक खरात हा ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असून त्यांच्यासोबत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

मनसे कडून वारंवार या हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. आरोपी अशोक खरातचे ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

काल कसा हल्ला झाला?

शिवाजी पार्क येथील पाच नंबरचं गेट आहे तिथून पुढं निघालो होतो तेव्हा अचानक कुणीतरी स्टम्पनं हल्ला केला. सुरुवातीला बॉल लागला असावं असं वाटलं. मात्र, स्टम्पनं डोक्यात मारण्याचा प्रयत्न झाला पण हातानं तो स्टम्प अडवला. यानंतर दुसऱ्या व्यक्तीनं पायावर मारल्यानं खाली पडल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सविस्तर चौकशी करण्यात झाल्यानंतर बोलणार आहे. मुंबईत शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्यासाठी आलेले होते त्यांचे कोच कोण होते हे देखील समोर आलं पाहिजे, असं संदीप देशपांडे म्हणाले.

ट्रॅक्टरच्या धडकेत रिक्षा पलटी, दोघा प्रवाशांचा मृत्यू, लग्नाच्या तोंडावर नवरदेवाची एक्झिट

आरोपी पकडले जातील, सर्व गोष्टी समोर येतील असं संदीप देशपांडे म्हणाले. मारेकऱ्यांकडून जी नावं ऐकली ती नावं मी घेतलेली आहेत. करोना घटोळा उघड केल्यानं हल्ला झाल्याचं संदीप देशपांडे म्हणाले. भांडूप कनेक्शन यामध्ये समोर आलेलं आहे. पोलीस तपास सुरु आहे, पूर्ण होईपर्यंत यावर बोलणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले.

गावातल्या तरुणाचा धक्का लागला, डोक्यात तिडीक, कुटुंबाने पोराचा जीवच घेतला; जळगाव हादरलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. संरक्षणासाठी दोन पोलीस पाठवले आहेत. आम्ही कुणाला भीक घालत नाही, त्यामुळं जी सुरक्षा दिली आहे ती विनम्रपणे काढून घ्यावी, असं संदीप देशपांडे म्हणाले. जी सुरक्षा द्यायची असेल ती ज्यांनी हल्ला केला त्यांना द्या, असं संदीप देशपांडे म्हणाले.

कसबा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, चिंचवडचा निकाल जगताप पॅटर्नचा भाजपचा नव्हे, संजय राऊतांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here