आपल्या महाराष्ट्राला कीर्तनाची मोठी परंपरा आहे. कीर्तनाचा हा गजर दररोज सकाळी एका वाहिनीवर पाहायला मिळतो. मालिकांच्या चित्रिकरणाला मिळालेल्या परवानगीनंतर ”चंही चित्रिकरण सुरू झालं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे नवीन भाग लवकरच दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि करत आहेत. अभिनेत्री दीप्ती भागवतन अलीकडेच परळी (बीड) येथे चित्रीकरणदेखील केलंय. प्रेक्षकांना नवीन भाग बघता यावेत म्हणून या कार्यक्रमाच्या चित्रिकरणासाठी संपूर्ण टीमनं प्रवास सुरू केला आहे. त्यात योग्य ती खबरदारी घेतली जातेय. सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेऊन या कार्यक्रमाचं चित्रीकरण होतंय.
याबद्दल सूत्रसंचालक दीप्ती भागवत म्हणाली, की ”गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाच्या तीन दिवसांच्या शेड्यूलमध्ये नुकतंच मी परळी वैजनाथमध्ये चित्रीकरण केलं. आता शूटिंग करतानाच्या प्रक्रियेत खूप बदल घडले आहेत. पूर्वी जितकं मोकळं वातावरण होतं, आता तसं राहिलेलं नाही. म्हणजे मुंबईपासून परळीपर्यंत जाण्यासाठी लागणारा इ-पास, त्यासाठी मला डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा द्यावं लागलं होतं. बरेच सोपस्कार पूर्ण करावे लागले. परळीला पोहोचल्यावरदेखील शूटिंग करताना आम्ही बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली.
शूटिंग सुरू करायच्या आधी आमच्या शरीराचं तापमान तपासलं जातं. संपूर्ण टीम पूर्णवेळ मास्क लावून असते. आम्ही जिथे जिथे शूटिंगला जाऊ त्या जागी सातत्यानं निर्जंतुकीकरण केलं जातं. तांत्रिक बाजू सांभाळणारी टीम संपूर्ण काळजी घेते. ते हातमोजे आणि सुरक्षेचा चष्मा लावूनच काम करतात. शूटिंग करताना सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेतली जाते. घरापासून इतक्या लांब येऊन शूटिंग करताना, घरच्यांच्या मनात थोडी धाकधूक होती. पण, हा कार्यक्रम आध्यात्मिक आहे, प्रत्यक्ष भक्तीशी जोडणारा आहे. चित्रीकरणात संपूर्ण काळजी घेतली जात असल्यानं ही भीती कमी झाली.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I like the valuable information you provide in your articles.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.