वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा एक व्हिडिओ जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओत चंद्रकांत ठाकरे ‘मोदी आयो रे’ गाण्यावर डान्स करत आहेत. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील एका होलिकोत्सव कार्यक्रमात त्यांनी ह्या गाण्यावर ठेका धरला.

चंद्रकांत ठाकरे हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे नेते मानले जातात. तसेच ते विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचेही निकटवर्तीय आहेत. मात्र आता तेच मोदी आयो रे गाण्यावर डान्स करत असल्याने जोरदार चर्चा आहे.

विशेष म्हणजे या आधीही देवेंद्र फडणवीस हे वाशिम जिल्ह्यात आले असताना त्यांची भेट घेतल्याने चंद्रकांत ठाकरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.

चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगलीच मुसंडी घेतली होती व तब्बल १४ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेस व वंचितसोबत युती करून ठाकरे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले मात्र नंतर ओबीसी आरक्षणामुळे त्यांचे जिल्हा परिषद सदस्यपद रद्द झाले होते. त्यामुळे अध्यक्षपद त्यांना सोडावे लागले होते.

नंतर पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत ते फारच थोड्या मताने विजयी झाले व पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. आता भाजपच्या ताब्यात असलेल्या कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातून २०२४ साठी ते इच्छुक आहेत.

महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीच्या हालचाली, स्वाभिमानी-रासपच्या साथीला तेलंगणाचे मुख्यमंत्री

याआधी २०१९ लाही त्यांनी तयारी केली होती, मात्र ऐनवेळी माजी आमदार प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादीत घरवापसी करत तिकीट मिळवले होते. तेव्हा ठाकरे अपक्ष लढण्याच्या विचारात होते मात्र शरद पवारांच्या आदेशाने त्यांनी माघार घेतली. आता प्रकाश डहाकेंच्या निधनानंतर चंद्रकांत ठाकरे या जागेसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत, मात्र त्यांचा मोदी आयो रे गाण्यावर डान्स आणि आधीची फडणवीस भेट यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

पाहा व्हिडिओ :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here