नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात भारतीय लोकशाही यासह विविध मुद्यांवर ते विद्यार्थ्यांना संबोधित करत आहेत. राहुल गांधी नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवतात. गेल्या ९ वर्षांच्या काळात राहुल गांधी यांनी प्रथमच मोदी सरकारच्या दोन धोरणांबाबत कौतुक केलं आहे. ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात एका कार्यक्रमा दरम्यान नरेद्र मोदी यांच्या दोन धोरणांचं त्यांनी कौतुक केलं आहे. मोदी सरकारने महिलांसाठी आणलेली उज्ज्वला योजना आणि लोकांची बँक खाती उघडणे ही चांगली गोष्ट होती, असं राहुल गांधी म्हणाले.

मोदींच्या या दोन धोरणांच राहुल गांधी यांनी केलं कौतुक

राहुल गांधींनी ब्रिटनच्या प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांना तुम्ही मोदींच्या कुठल्या दोन धोरणांचं कौतुक कराल, असं विचारण्यात आलं. तेव्हा राहुल गांधी यांनी महिलांसाठी आणलेली उज्ज्वला योजना आणि लोकांची बँक खाती उघडणे हे चांगले पाऊल आहे असं म्हटलं. राहुल गांधी यांनी मोदींच्या दोन धोरणांचं कौतुक केलं.

ट्रॅक्टरवर जाताना हादरे, अचानक प्रसूती कळा, रस्त्यावरच प्रसूती; खुरप्याने बाळाची नाळ कापली

भारतात लोकशाही धोक्यात

राहुल गांधी यांनी सरकारच्या दोन धोरणांच कौतुक केलं तसच सरकारवर टीका देखील केली आहे.केंब्रिज विद्यापीठात ते म्हणाले की भारतात लोकशाहीला धोका आहे. माझ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, असंही ते म्हणाले. राहुल गांधींनी याच दरम्यान स्पाय सॉफ्टवेअर पेगाससचाही उल्लेख केला. माझ्या फोनमध्येही पेगासस होता. फोनवर बोलताना आवाज रेकॉर्ड होत असल्याचे अधिकारी मला सांगायचे. अधिकाऱ्यांनी फोनवर जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. विरोधी पक्षातील जे नेते बोलायचे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं राहुल गांधी म्हणाले.

…तर रवींद्र धंगेकरच पुणे लोकसभेचे उमेदवार? कसब्याचा गड सर करताच मविआ कार्यकर्ते प्रचंड आशावादी, चर्चा सुरु

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नरेंद्र मोदी भारतावर एक विचार थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो विचार थोपवण्याचा प्रयत्न झाल्यास भारतातून विरोध होणार आहे, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी ब्रिटनमध्ये नव्या लुकमध्ये दिसले होते.

सप्तशृंगी गडावर मोठी घटना, CCTV कॅमेऱ्याला लावला चुना, दानपेटीत जळालेल्या नोटा, काय चाललंय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here