वॉशिंग्टन: व्यापार करार आणि करोना संसर्गाच्या वाढत्या मुद्यावर अमेरिका आणि चीनमधील वाद वाढत असून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यातच अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक धोरण अवलंबले असून आता भारताच्या पावलावर पाऊल ठेवत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेणार आहे. अमेरिकन सरकार आता चिनी अॅप टिकटॉकवर बंदी आणणार असल्याचे निश्चित झाले असून लवकरच त्यासाठी एक आदेश काढणार आहे. तर, दुसरीकडे या बंदीपासून वाचण्यासाठी टिकटॉकने हालचाली सुरू केल्या आहेत.

चीनने लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी केल्यानंतर भारताने चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला. सुरक्षितेच्या कारणास्तव भारताने १०६ चिनी अॅप्सवर बंदी घातली. अमेरिकेनेही भारतासारखे पाऊल उचलण्याचे संकेत दिले होते. ‘एएफ१’नुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या निर्णयावर शनिवारीच आदेश काढण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, आम्ही काही गोष्टींवर निर्णय घेऊ शकतो. आमच्यासमोर इतरही अनेक पर्याय आहेत. आम्ही टिकटॉकच्या मुद्यावर काही पर्याय शोधत असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:

वाचा:

दरम्यान, टिकटॉक अमेरिकेतील बंदीपासून वाचण्यासाठी धडपड करत असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील बाजारपेठ कायम रहावी यासाठी काही शेअर्स विकण्याची तयारी टिकटॉकची मुख्य कंपनी बाइटडान्सने दर्शवली असल्याचे वृत्त होते. त्यादृष्टीने त्यांची चाचपणीही सुरू असल्याची माहिती समोर आली होती. आता, टिकटॉकचे अमेरिकेतील ऑपरेशन्स मायक्रोसॉफ्ट कंपनी खरेदी करू शकते, असे वृत्त आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टची याबाबतची चर्चा सुरू असून सोमवारी अब्जावधींच्या कराराची माहिती समोर येऊ शकते. बाइटडान्स कंपनी, मायक्रोसॉफ्ट आणि व्हाइट हाउसचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू असल्याचे ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कराराच्या विरोधात आहेत. त्यामुळे हा करार होईलच, अशी खात्री देता येत नसल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

वाचा:

अमेरिकन काँग्रेसच्या २५ सदस्यीय एका टीमने राष्ट्रपती ट्रम्प यांना अमेरिकन नागरिकांच्या डेटा सुरक्षितेबाबत पावले उचलण्याचा आग्रह केला होता. टिकटॉकच्या डेटामुळे चीनचा कम्युनिस्ट पक्ष आणि सरकार अधिक सक्षम होत असल्याचा दावा त्यांनी केला. भारताने टिकटॉकसह १०६ अॅपवर बंदी आ. यामध्ये बाइट डान्स कंपनीशी निगडीत टिकटॉक आणि हॅलो या दोन मुख्य अॅपचा समावेश होता. हे दोन्ही अॅप भारतात लोकप्रिय आहेत. भारताने बंदी घातल्यामुळे बाइट डान्सला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच इतर देशांतील बंदीपासून वाचण्यासाठी बाइट डान्सने धडपड सुरू केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here