pune terrible accident, बाळुमामा पालखी दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; ट्रॅक्टरची चाकं तुटून बाहेर पडली – terrible accident of pickup vehicle and tractor in pune many injured who was coming back from balumama palkhi tal
पुणे: बाळुमामाच्या पालखी तळावर जेवणाची पंगत आणि धार्मिक विधी करण्यासाठी करमाळा येथील भाविक शिरूर तालुक्यातील करंदी येथे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी आले होते. धार्मिक कार्यक्रम उरकून घरी परतत असताना न्हावरे – तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाट येथे पिकअप जीप आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर जोरात धडक झाली. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धडक एवढी भयानक होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात राजश्री अण्णा चोपडे (वय ४०) , श्रुती दुर्गडे (वय ३०) , शोभा परमेश्वर महानवर (वय ५५), मिना वाघमोडे (वय ४५) , सावित्री आशिष पाटील (वय ४०), रुपाली अण्णा केसकर (वय ३०), कविता युवराज बोराटे (वय ३५), अंजली महारनोर (वय ७) हे सर्वजण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. वरील सर्वजण करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी आहेत. क्षणात संसाराची माती, पत्नीने विष घेतलं अन् पतीनेही आयुष्य संपवलं…. कारण हादरवणारं याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा येथील भाविक शिरूर तालुक्यातील करंदी येथे मुक्कामी असलेल्या बाळुमामाच्या पालखी तळावर जेवणाची पंगत आणि धार्मिक विधी करण्यासाठी आले होते. धार्मिक विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर परतीच्या मार्गावर पिकअप गाडीतून करमाळ्याकडे निघाले होते.
न्हावरे – तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहीवडी घाटात तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारे तसेच भाविक बसलेले पिकअप आणि न्हावरेच्या दिशेकडून येणारा ट्रँक्टर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रँक्टर चालकाने चुकीच्या दिशेने आपले वाहन आणल्याने हा अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रँक्टरचे पाठीमागची चाके तुटून बाजुला पडली आहेत. तसेच ट्रँक्टरच्या इतर भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.