शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना ‘वाड्यावरती भेटायला या’ असा शब्दप्रयोग करणे एका पोलिस उपनिरीक्षकाला महागात पडले आहे. या उपनिरीक्षकाची एक वर्ष वेतनवाढ थांबविण्याची शिक्षा अपर पोलिस आयुक्तांनी सुनावली आहे.
अशोक टोके असे वेतनवाढ थांबविण्यात आलेल्या उपनिरीक्षकांचे नाव आहे. टोके हे शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात राखीव पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या हाताखाली काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना ‘तुम्ही वाड्यावरती भेटायला या’ असे म्हणत होते. याची तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. या तक्रार अर्जांची दखल घेऊन सहायक पोलिस आयुक्तांनी चौकशी करून, आपला अहवाल अपर पोलिस आयुक्त यांच्याकडे सादर केला होता.
पोलिस आयुक्त कार्यालयाकडून टोके यांच्याकडे त्यांचा खुलासा मागविण्यात आला. मात्र, हा खुलासा समाधानकारक वाटला नाही. ‘वाडा’ हा शब्दप्रयोग महिलांच्या बाबतीत करणे उचित नसून चौकशी अहवालामध्ये टोके यांची कसुरी निष्पन्न झाली आहे. त्यानुसार त्यांना एक वर्षे वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनविण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I really like and appreciate your blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.