नाशिक : जिल्ह्यातील वणी बसस्थानक परिसरातील खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी अवघ्या सहा तासांत मृतदेहाची ओळख पटवून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन भाच्यांच्या जामिनासाठी आलेल्या नाशिक येथील तरुणाच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला असून आर्थिक देवाण-घेवाणीतून ही हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, विनोद उर्फ रॉक मधुकर मोरे (वय ३५, रा. भारतनगर, इंदिरानगर, नाशिक) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. वणी बसस्थानकात गुरुवारी २ मार्च रोजी मध्यरात्री १ ते ४ वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा आरोपींनी डोक्यावर व अंगावर दगडाने घाव घालून खून केला होता. त्यानंतर बसस्थानकाच्या स्वच्छतागृहाच्या बाजूला मोकळ्या जागेत काटेरी झाडांमध्ये मृतदेह फेकला. हा प्रकार शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.विनोद मोरे याच्या दोन भाच्यांना पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांच्या जामिनासाठी मोरे हा तीन मित्रांसमवेत दिंडोरी येथे आला होता. त्यानंतर मोरे व त्याचे मित्र वणीला आले. या ठिकाणी त्यांनी एका वाईन शॉपमधून दारू खरेदी केली. सर्वांनी वणी बसस्थानक परिसरात रात्री उशीरापर्यंत मद्यपार्टी केली. त्यावेळी मोरे यांना पत्नीने कॉल केला. आर्थिक व्यवहारातील ३० हजार रुपये मोरे यांना द्या, असे तिने मोरेंच्या मित्रांना सांगितले. त्यातून चौघांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी मोरे याच्यासोबत असलेल्या मित्रांना राग आल्याने मद्यधुंद अवस्थेत त्यांनी विनोद मोरेच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, याप्रकरणी विनोद मोरे याची पत्नी मंगल मोरे यांनी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी छोटू उर्फ हरीष काळुराम प्रजापती, दीपक गायकवाड, मतीन आयास काझी (सर्वजण रा. भारतनगर, इंदिरानगर, नाशिक) या आरोपींना अटक केली. यातील एक संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here