ब्रिटीश अमेरिकन टोबॅको नावाच्या कंपनीची अनुदानित कंपनी असलेली कँटका बायोप्रोसेसिंग एप्रिल महिन्यातच करोनाला अटकाव करणारी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. आता या लशीची लवकरच मानवी चाचणी होणार आहे. लंडनमधील सिगारेट उत्पादक कंपनी लकी स्ट्राइक सिगरेटचे मुख्य मार्केटिंग अधिकारी किंग्सेल व्हीटन यांनी सांगितले की, कंपनीने अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे मानवी चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. परवानगीसाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. मात्र, परवानगी मिळताच तातडीने या लशीची मानवी चाचणी सुरू करण्यात येणार आहे.
वाचा:
ही लस तंबाखूच्या पानापासून बनवण्यात आली आहे. तंबाखूच्या पानातून काढण्यात आलेल्या प्रोटीनमधून लस तयार करण्यात आली होती. व्हीटन यांनी सांगितले की, मानवी चाचणीसाठी आम्हाला परवानगी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. प्री-क्लिनिकल चाचणीमध्ये या लशीचे परिणामक सकरात्मक आले असून करोनाला अटकाव करण्यासाठी ही लस प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंबाखूच्या पानातील प्रोटीन काढून त्याला लशीच्या जीनोमसोबत एकत्र करत जेनेटिक इंजिनियरिंग करून ही लस तयार केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
वाचा:
दरम्यान, जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचे विधान केले आहे. करोनाला अटकाव करणारी लस उपलब्ध होण्यास काही कालावधी लागणार असून तोपर्यंत करोनासोबत जगायला शिकायला हवे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी म्हटले. त्याशिवाय त्यांनी युवकांनाही इशारा दिला आहे. करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका युवकांना असल्याचाही इशारा त्यांनी दिला. अनेक देशांमधील युवक करोनाच्या संसर्गाला साधारण आजार समजत आहे. मात्र, अशी समज ठेवणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. याआधीही जागतिक आरोग्य संघटनेने युवकांनाही करोनाची बाधा होऊ शकते असा इशारा दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
A big thank you for your article.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.