कळवा पोलिसांनी या कारवाईमध्ये गुटख्याचा २२ लाखांचा साठा, १० लाखांपेक्षा अधिक किंमतीची औषधे (२६५ बॉक्स), टेम्पोसह एकूण ४७ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे गुटख्याची ही तस्करी औषधांच्या आडून करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक करत असताना, याबाबत कोणाला काही कळू नये यासाठी तस्करांनी गुटख्याच्या गोण्यांच्या पाठीमागे आणि पुढे औषधे ठेवली होती. तस्करांची ही चलाखी पोलिसांनी ओळखली. या प्रकरणी टेम्पो चालक, मुंबईतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकासह एकूण सहा जणांविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
Home Maharashtra 20 lakh gutka seized, औषधांच्या आडून सुरु होती भलत्याच गोष्टीची तस्करी, पोलिसांनी...
20 lakh gutka seized, औषधांच्या आडून सुरु होती भलत्याच गोष्टीची तस्करी, पोलिसांनी धाड टाकताच सापडले लाखोंचे घबाड – gutka worth rs 20 lakh seized by kalva police, truck driver held
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः औषधांच्या आडून करण्यात येणाऱ्या गुटखा तस्करीचा कळवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी रात्री कळव्यातील पारसिक सर्कल येथे पोलिसांनी टेम्पो पकडल्यानंतर टेम्पोमध्ये असलेला गुटख्याविषयी कळू नये यासाठी तस्करांनी गुटख्याच्या गोण्यांच्या पुढे आणि मागे चक्क औषधे ठेवली होती. गुटखा तस्करांची ही चलाखी पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने बरोबर ओळखली. आणि टेम्पोमधून तब्बल २२ लाखांचा गुटख्याच्या साठ्यासह १० लाखांची औषधे जप्त करत पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. या प्रकरणात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीमध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाचाही समावेश आहे.