नाशिक : नाशिक जिल्ह्यात प्रथमच प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नाशिकच्या निफाड तालुक्यात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे बॅनर्स देखील निफाड शहरात लागले होते. गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाला चाहत्यांनी अक्षरशः तिकीट खरेदी करत लावणी महोत्सवाला गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नाशिकच्या निफाड मध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलने माध्यमांशी संवाद साधला आहे. पुण्यातील कार्यक्रमात जो प्रकार घडला त्यावर गौतमी पाटीलनं प्रतिक्रिया दिली आहे. त्याबाबतीत कायदेशीर कारवाई सुरु आहे. मी त्याबाबतीत काही बोलू शकत नाही, असं गौतमी पाटील म्हणाली.

गौतमी पाटीलच्या निफाडमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पेड पास ठेवण्यात आले होते. तरी देखील मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी पास खरेदी करत गर्दी केली होती.

गौतमी पाटीलचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादामुळे देखील गौतमीचा कार्यक्रम वादात सापडला होता. त्या व्हायरल व्हिडिओ वर प्रतिक्रिया देण्यास गौतमीनं नकार दिला आहे. यावेळी आपल्या कार्यक्रमात अनेक तरुणांकडून हुल्लडबाजी केली जाते, त्यांना काय आवाहन कराल असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मला त्या प्रकरणावर काहीही बोलायचं नाही, असं गौतमी पाटील म्हणाली.

Weather Alert : राज्यावर अस्मानी संकट, मुंबईत घामाच्या धारा तर ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. सोशल मीडियावर गौतमी पाटील कमबॅक म्हटलं जात आहे. याचा मला अभिमान आहे. आपल्याला त्यांची साथ आहे या गोष्टीचं देखील चांगलं वाटतं, असं ती म्हणाली. मला प्रेक्षकांचे प्रेम नेहमीच मिळत आलं आहे, अजून जास्त मिळतंय याचा मला आनंद आहे, असंही ती म्हणाली.

Rajan Salvi: एसीबीकडून राजन साळवींच्या घराची मोजणी, सततची चौकशी; अधिकाऱ्यांनी घराला टेप लावताच…

पुण्यातील व्हायरल विडिओवर बोलताना गौतमी म्हणाली की कायदेशीर कारवाई चालू आहे.पोलिसांकडे तक्रार दिली आहे, माझं बोलणं चालू आहे, असं गौतमी पाटील म्हणाली. व्हिडिओ प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली आहे. रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली, त्यासोबत आहेत, त्यांनी ताबडतोब कारवाई करा अशा सूचना केल्या आहेत, हे चांगलं वाटलं असं गौतमी पाटील म्हणाली. माझी मनस्थिती ठीक नाही म्हणत गौतमी पाटीलनं अधिक भाष्य करण टाळलं.

Satara News: शर्यत सुरु होताच आक्रित घडलं, बैलगाडा उंचावरुन कृष्णा नदीत पडला, दोन्ही बैलांचा गुदमरुन मृत्यू

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी थेट मोदींनाच डिवचलं; ‘मोदी आयो रे’ गाण्यावर भन्नाट डान्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here