छत्रपती संभाजीनगर : तक्रारदार आणि व्यावसायिकाचा समेट घडवून आणल्यानंतर तक्रारदाराला २० हजार रुपये लाचेची मागणी सहायक पोलीस निरीक्षकानं केली होती. पहिला हफ्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना शनिवारी एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ए.सी.बीच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला आहे. मानसिंग रायसिंग घुनावत वय ४२ असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,बजाजनगर भागात राहणारे ४२ वर्षीय तक्रारदाराने परिसरात एक भूखंड खरेदी केला होता. या भूखंडासाठी तक्रारदाराने प्लॉटिंग व्यावसायिकाकडे २ लाख पेक्षा अधिक रक्कम दिली होती. मात्र, या भूखंडाच्या मालकी हक्काची कागदपत्रे दुसऱ्याकडे असल्याचे समजल्याने भरलेले पैसे परत मिळावे, यासाठी तक्रारदाराने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याच तपास घुनावत करीत होते. या तक्रार अर्जावरून सहायक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत यांनी व्यावसायिकला बोलावून समेट घडवून आणला.

लेकीच्या लग्नासाठी सुट्टीवर, पण एका अपघाताने सारेच हिरावले, १०वीचा पेपर देऊन मुलाने दिला अग्नी

व्यावसायिकांनी धनादेश देण्याची तयारी दर्शविली होती. यानंतर मदनसिंग घुनावत याने तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली.मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालय गाठत तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने शहानिशा करत सापळा रचला असता सहायक निरीक्षक घुनावत यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी करून पाहिला हफ्ता म्हणून दहा हजार रुपये स्वीकारले. पैशे स्वीकारताच पथकाने घुनावत यांना अटक केली.या प्रकरणी एम.आय.डी.सी.वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीम इंडिया WTC च्या अंतिम फेरीत पोहोचणार का? अहमदाबाद कसोटी निर्णायक ठरणार, जाणून घ्या समीकरण

लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लाचखोरीच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे. राज्यातील विविध भागात ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी देखील लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याचं समोर आलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं वेळोवेळी या बाबत कारवाया सुरु ठेवल्या आहेत. आता पोलीस अधिकारीच लाचखोरीच्या प्रकरणात आढळला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील लाचखोरीच्या घटना कधी थांबणार असा सवाल उपस्थित होत आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्या लाचखोरी प्रकरणात कठोर कारवाई केली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं, शिंदे गटाच्या विजय शिवतारेंकडून टीकास्त्र

भाजपच्या गणेश बीडकरांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा कॉंग्रेसचा आरोप; दोन्ही गटात झटापट, व्हिडीओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here