नवी मुंबई : हापूस आणि आंबा प्रेमींसाठी खुशखबर आहे. नवी मुंबईतील बाजार समितीत हापूस आणि आंब्याच्या पेट्यांची आवक वाढली आहे. दिवसाला जवळपास १० हजारांहून अधिक पेट्या बाजारात दाखल होत आहेत. ही गेल्या चार ते पाच महिन्यातील सर्वात मोठी आवक आहे. हापूस आणि इतर आब्यांची आवक वाढल्यानं दर कमी होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यामुळं ग्राहकांना किफायतशीर दरात फळं उपलब्ध होती. मे महिन्यापर्यंत १ लाख पेट्यांपर्यंत आवक वाढणार आहे.

हापूस आंबा २ हजार ते ७ हजार रुपये पेटी प्रमाणं विकले जातात. एका पेटीमध्ये ४ ते ८ डझन आंबे असतात. आंब्यांची संख्या दर्जावर अवलंबून असते. हापूसच्या एका पेटीची किंमत ४ ते १० हजारांवर देखील जाते.

उन्हाची तीव्रता वाढून आंब्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून गेल्या ४ ते ५ वर्षांपासून फेब्रुवारी ते मार्च महिन्यात ५ ते ८ हजार आंब्यांच्या पेट्यांची आवक सुरु होते, असं जाणकारांनी सांगितलं आहे. बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी यावेळी आवक वाढल्याचं सांगितले.

कोणी फोडला १२ वीच्या गणिताचा पेपर, आरोपीला शोधण्यात पोलिसांना मोठं यश; नाव वाचून हादराल…

गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजार समितीत ११ हजार पेट्या दाखल होत आहेत. महाराष्ट्र आणि राज्याबाहेरुन आंब्यांची आवक होत आहे. महाराष्ट्रातून नवी मुंबई बाजार समितीत ६० टक्के आवक होत आहे. कोकणातील रत्नागिरी, देवगडमधून सर्वाधिक आंबा नवी मुंबई बाजार समितीत दाखल होत आहे. कर्नाटकातून देखील आंबा दाखल होत असून गुजरातमधून देखील मुंबईच्या बाजार पेठेत आंबा दाखल होतो. गुजरातमधून पुढील महिन्यात आंबा दाखल झाल्यास आंब्याचे दर घसरतील, असं एका व्यापाऱ्यानं सांगितलं.

IND vs AUS: स्मिथ की कमिन्स? अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद कोणाकडे; समोर आली मोठी अपडेट

महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकणासह विविध भागातील शेतकरी आंबा उत्पादन घेत असतात. आंबा उत्पादक पांडुरंग गुळवे यांनी वातावरण वाढू लागल्यानं वेगवान वारे वाहण्याची आणि पावसाची शक्यता असते. त्यामुळं आंबा खराब होण्याची शक्यता असते,त्यामुळं फेब्रुवारी मार्चपासून आंबा बाजारपेठेत दाखल होत असल्याचं गुळवे म्हणाले. गेल्यावर्षी मान्सून लांबल्यानं देवगड हापूस आंबा बाजारात उशिरा दाखल होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या विषयाबद्दल माझा फारसा अभ्यास नाही, मांसाहारी भोजनानंतर देवदर्शनाबद्दल सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

तुमच्या कोंबडीहूलला आम्ही भीक घालत नाही; व्हिपवर प्रश्न विचारताच भास्कर जाधवांचा निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here