क्लाफासियो डियास यांची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ते आढळले आहेत. त्यांच्या ईएसआय रुग्णालयातून मेडिकल कॉलेज (Goa Medical College) रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना श्वासोच्छवास घेण्यात अडथळे जाणवत आहेत, असं राज्याचे आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.
डियास यांची गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या करोना चाचणीचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आल्यानं त्यांना ईएसआय (Employee State Insurance) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु, शुक्रवारी डियास पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आढळले.
‘आयसीएमआर’नं जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्सनुसार, रुग्ण बरा झाल्याची चिन्हं दिसल्यावर त्यांना चाचणीशिवाय डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. त्यामुळे, रुग्णालयातून डिस्चार्ज करताना रुग्णाला चाचणीशिवाय घरी पाठवण्यात येतं. रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतरही त्याच्या शरीरात करोना विषाणूचे अंश उरलेले असू शकतात, असंही मोहनन यांनी म्हटलंय. क्लाफासियो डियास हे राज्यातील पहिले आमदार आहेत जे कोविड १९ पॉझिटिव्ह आढळले आहेत.
वाचा : वाचा :
गोव्यातील करोनास्थिती
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, गोव्यात सध्या १६५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आत्तापर्यंत ४२११ जणांनी करोनावर मात केल्याचं सांगितल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलीय. तर राज्यात ४५ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहे.
देशातील करोना आकडेवारी
दुसरीकडे करोना संक्रमणानं आज पुन्हा एकदा आपले सगळे रेकॉर्डस तोडलेत. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ५७ हजार ११७ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत तर गेल्या २४ तासांत तब्बल ७६४ करोनारुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. याबरोबरच देशातील एकूण करोना संक्रमितांचा आकडा १६ लाख ९५ हजार ९८८ वर पोहचलाय. यातील ५ लाख ६५ हजार १०३ जणांवर उपचार सुरू आहे तर १० लाख ९४ हजार ३७४ जण संक्रमणमुक्त झालेत. देशात करोना व्हायरसनं आत्तापर्यंत ३६ हजार ५११ बळी घेतलेत.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I really like and appreciate your blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.