मुंबई: दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे पहाटे २ वाजण्याच्या सुमारास बसलेल्या एका व्यक्तीकडून एका पोलीस कर्मचाऱ्याने २५०० रुपयांची लाच घेतल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला या व्यक्तीने यूपीआयद्वारे ही लाच दिली असून त्याचा स्क्रिन शॉटच या व्यक्तीने ट्विट करत सार्वजनिक केला आहे. विग्नेश किशन असं या व्यक्तीचं नाव आहे.

ही लाच दिल्यानंतर संतापलेल्या विग्नेश किशन यांनी मुंबईत आता हेच व्हायचं बाकी राहिलं आहे, अशी प्रतिक्रिया या व्यक्तीने व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांनी या ट्वीटची दखल मुंबई घेतली आहे. या प्रकरणाची अधिकची माहितीही पोलिसांनी मागवून घेतली आहे.

Sleep Tourism : फक्त चांगली झोप मिळावी म्हणून लोक करतात पर्यटन, कारण वाचून व्हाल हैराण
विग्नेश किशन म्हणतात की, ‘मी रात्री मरीन ड्राइव्ह येथे फिरायला गेलो होतो. मी मरीन ड्राइव्हवर बसलो होतो. त्यावेळी तेथे एक पोलीस कर्मचारी माझ्याकडे आला आणि माझ्याकडे लाच मागितली. त्यानंतर यूपीआयच्या माध्यमातून मी २५०० रुपये त्या पोलीस कर्मचाऱ्याला दिले.’ विग्नेश किशन यांनी पोलीस कर्मचाऱ्याला ट्रान्सफर केलेल्या पैशांचा एक स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला. या स्क्रीनशॉटमध्ये दिनांक ४ मार्च रोजी पहाटे २ वाजून १८ मिनिटांची वेळ दिसत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये विग्नेश किशन यांचे नाव आहे. तसेच त्यांनी ज्या पोलीस कर्मचाऱ्याला हे पैसे दिले आहेत त्याचेही नाव दिसत आहे.

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, पेपरफुटी प्रकरणावर राज्य शिक्षण मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय
मुंबई पोलीस सक्रिय

या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.या प्रकरणी तपासही सुरू केला आहे. दरम्यान, विग्नेश किशन यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.सार्वजनिक ठिकाणी बसल्यावर असा दंड लावणे कितपत योग्य आहे असेही अनेकांनी विचारले आहे. इतकेच नाही तर, असा अनुभव आपल्यालाही आला असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे. तर दंडाची रक्कम भरल्यानंतर विग्नेश किशन यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याकडून पोचपावती का बरं मागितली नाही, अशी विचारणाही काहींनी केली आहे.

टीम इंडियासमोर डान्सिंग कॉप रणजीत सिंह यांनी केला डान्स, बसमधून विराट कोहलीने घेतली मजा
मरीन ड्राईव्ह हे दक्षिण मुंबईतील फिरण्याचे प्रसिद्ध ठिकाण

दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे दररोज असंख्य लोक फिरण्यासाठी येतात. यात तरुणांचा भरणा अधिक असतो. या ठिकाणी दिवसभर फिरण्यासाठी कोणतेही नियंत्रण नाही. मात्र, मध्यरात्रीनंतर १ वाजल्पासून पुढे पहाटेपर्यंत या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. रात्री या ठिकाणी काही अप्रिय घटना घडत असतात. त्या टाळता याव्यात यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात पोलीस गस्तही घालत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here