नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागात आज अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. जिल्ह्यातील बागलाण पट्ट्यात सटाणा कळवणसह अन्य काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. धुळे जिल्ह्यातही ग्रामीण भागात शिरपूर, साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

कळवण सटाणा भागात हलक्या सरी तर कळवणच्या पश्चिम पट्ट्यात अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत, परिसराला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. आंबा, गहू, हरभरा, मसूर, वाटाणा यासह कांदा उत्पादकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तर अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरीही चिंतेत पडले आहेत.

अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे शेती पिकावर मोठा परिणाम झाला आहे. अगोदरच कांदा, पालेभाज्या, कोबी यासारख्या काही भाज्यांना बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सुतलानही संकटासह अस्मानी संकटामुळे शेतकरी आणखी चिंतेत आले आहेत.

नाशिक ग्रामीणच्या सटाणा कळवण भागात झालेल्या पावसानं काढणीसाठी आलेला गहू हरभऱ्याची पिके अक्षरशः झोपून गेली आहेत. अगोदरच भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला होता. आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्याने संकटात सापडला आहे.

यशाचं शिखर गाठण्यापूर्वीच १२वीच्या विद्यार्थ्याचा नियतीनं घात केला, घटनेनं देवरे कुटुंबाला धक्का
अवकाळी पावसाचा इशारा

कोकण वगळता इतर महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे. येत्या मंगळवारी ७ मार्चला गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कारला अपघात, पण ४ किलोमीटर अंतरावर आढळला चालकाचा मृतदेह, नग्न अवस्थेत फासावर लटकलेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here